Shikhar Dhawan Autobiography : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन हा अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्टवक्त्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. तो जीवन पूर्ण उत्साहाने जगणारा व्यक्ती आहे. मैदानावर असो वा मैदानाबाहेर, धवन नेहमीच आकर्षक व्यक्तिमत्त्व राहिला आहे. माजी भारतीय सलामी फलंदाजाने २००६ मधील त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक खळबळजनक खुलासा केला आहे. हा खुलासा त्याने त्याच्या ‘द वन: क्रिकेट, माय लाइफ अँड मोअर’ या आत्मचरित्रात केला आहे. ऑस्ट्रेलियातील इंडिया-ए दौऱ्याच्या आठवणी सांगताना धवनने सांगितले की, त्यानी त्या दौऱ्यादरम्यान एक गर्लफ्रेंड बनवली होती आणि नंतर तिला त्यानी रोहित शर्मासोबत शेअर करत असलेल्या हॉटेलच्या रुममध्ये आणले होते. त्यानी या घटनेवर रोहितच्या प्रतिक्रियेचाही खुलासा केला. शिखर धवनने सांगितलं की त्यानी गर्लफ्रेंडला हॉटेलच्या रुममध्ये कसं आणलं होतं. त्याचं आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं रिलेशन संपूर्ण संघात कसं व्हायरल झालं होतं? याबाबत त्याने आपल्या आत्मचरित्रात खुलासा केला आहे. शिखर धवनने आत्मचरित्रात काय खुलासा केला? शिखर धवनने त्याच्या आत्मचरित्रात लिहिलं की, “ती खूपच सुंदर होती आणि अचानक मला पुन्हा प्रेमाची अनुभूती झाली! मला वाटलं, ही माझ्यासाठीच बनली आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे.” धवनने पुढे लिहिलं, “मी एका सराव सामन्यात अर्धशतकासह सुरुवात केली आणि माझा दौरा चांगला सुरू होता. प्रत्येक सामन्यानंतर मी तिला भेटायला जात असे आणि लवकरच मी तिला माझ्या हॉटेलच्या रुममध्ये लपवून आणायला सुरुवात केली, जी रुम मी रोहित शर्मासोबत शेअर करत होतो. कधी-कधी तो हिंदीत तक्रार करायचा, तू मला झोपू तरी देणार आहेस का?” हेही वाचा – IND vs AUS : विराट-रोहितची ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड क्रेझ! सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं संघांतील लोकांना कसं समजलं? धवनने पुढे लिहिलं, “एका संध्याकाळी, जेव्हा मी तिच्यासोबत डीनरसाठी गेलो, तेव्हा तिच्या उपस्थितीची बातमी संपूर्ण संघात जंगलातल्या आगीसारखी पसरली. आमच्यासोबत दौऱ्यावर असलेल्या एका वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्याने आम्हाला लॉबीत हातात हात घालून चालताना पाहिले. मला हेही सुचले नाही की मला तिचा हात सोडायला हवा, कारण माझ्यासाठी आम्ही कोणताही गुन्हा करत नव्हतो. त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मी सातत्याने चांगली कामगिरी केली असती, तर कदाचित मी वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवले असते, पण माझी कामगिरी सातत्याने खालावत गेली.” हेही वाचा – Rohit Sharma : ‘…म्हणून हार्दिक पंड्याला किस केलं होतं’, रोहित शर्माने केला खुलासा शिखर धवनची कारकीर्द – शिखर धवनने भारतासाठी ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळले. त्याची सर्वोत्तम कामगिरी ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये होती ज्यामध्ये त्याने ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने १७ शतके आणि ३९ अर्धशतके केली. कसोटी फॉर्मेटमध्ये धवनने ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या. त्याने ७ शतके आणि ५ अर्धशतके केली. शिखर सध्या सोफियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे .