लोकसभेत ‘वंदे मातरम’वर १० तास विशेष चर्चा ; पंतप्रधान म्हणाले,”वंदे मातरममुळे नवी ऊर्जा… “

Parliament Winter Session। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. लोकसभेत वंदे मातरमवर प्रदीर्घ चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची सुरुवात केली. त्यांनी चर्चेची सुरूवात करताना लोकसभेत, “देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला ऊर्जा देणारा आणि प्रेरणा देणारा तसेच त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवणारा मंत्र, ‘वंदे मातरम’, या घोषणेचे स्मरण करणे हे आपल्यासाठी भाग्य आहे.” असे म्हटले.
“वंदे मातरम” या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत विशेष चर्चा होत आहे. या विशेष चर्चेदरम्यान सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला ऊर्जा आणि प्रेरणा देणारा आणि त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवणारा मंत्र, घोषणा ‘वंदे मातरम्’ याचे स्मरण करणे या सभागृहातील आपल्या सर्वांसाठी एक मोठा सन्मान आहे.”असे म्हटले. तसेच पंतप्रधान पुढे म्हणाले, “वंदे मातरम् १५० वर्षे पूर्ण करत आहे आणि आपण सर्वजण या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहोत हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेत पुढे बोलताना, “जेव्हा वंदे मातरमला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देश गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलेला होता. जेव्हा १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देश आणीबाणीच्या अंधारात होता. आज, १५० वर्षे पूर्ण होत असताना, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि वेगाने प्रगती करत आहे.” पंतप्रधान म्हणाले, “हे पवित्र वंदे मातरम आहे ज्याने स्वातंत्र्यलढ्याला धैर्य आणि दृढनिश्चयाचा मार्ग दाखवला. आज या सभागृहात त्याचे स्मरण करणे आपल्या सर्वांसाठी खूप मोठा सन्मान आणि अभिमानाची गोष्ट आहे.”असे म्हटले.
#WATCH | PM Narendra Modi says, “Vande mataram became the voice of our freedom movement. It integrated everyone in the country and became the resolve of every Indian… ‘Swaarth ka balidaan hai ye shabd Vande Mataram’… ‘Veer ka abhimaan hai ye shabd Vande Mataram’… During the… pic.twitter.com/n1R5BlP3Xk
— ANI (@ANI) December 8, 2025
दरम्यान , पंतप्रधान मोदींनी वंदे मातरमशी संबंधित एक किस्सा सांगताना, “२० मे १९०६ रोजी बरिसाल (आता बांगलादेशमध्ये) येथे वंदे मातरम मिरवणूक काढण्यात आली होती, ज्यामध्ये १०,००० हून अधिक लोक रस्त्यावर उतरले होते. हिंदू आणि मुस्लिमांसह सर्व धर्म आणि जातींचे लोक वंदे मातरमचे झेंडे घेऊन रस्त्यावरून निघाले.” रंगपूरमधील एका शाळेत मुलांनी हे गाणे गायले तेव्हा ब्रिटिश सरकारने २०० विद्यार्थ्यांना फक्त वंदे मातरम म्हटल्याबद्दल प्रत्येकी ५ रुपये दंड ठोठावला. त्यानंतर, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अनेक शाळांमध्ये वंदे मातरम गाण्यावर बंदी घातली.असे सांगितले.
“वंदे मातरम्” मध्ये हजारो वर्षांची सांस्कृतिक ऊर्जा, स्वातंत्र्याची भावना आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार झाले. १८५७ नंतर भारतात त्यांचे दीर्घकालीन अस्तित्व अधिकाधिक कठीण होत चालले आहे हे ब्रिटिशांना समजले होते. त्यांनी आणलेल्या स्वप्नांना न जुमानता, त्यांना हे स्पष्ट झाले की जोपर्यंत भारताचे विभाजन होत नाही आणि लोकांना एकमेकांविरुद्ध उभे केले जात नाही तोपर्यंत राज्य करणे कठीण होईल. त्यानंतर ब्रिटिशांनी “फोडा आणि राज्य करा” हा मार्ग निवडला आणि त्यांनी बंगालला त्यांची प्रयोगशाळा बनवले.असेही त्यांनी यावेळी म्हटले.
लोकसभेच्या कामकाजापूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, “वंदे मातरम” या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल. ” दरम्यान, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या धोरणांचे कौतुक केले. ते म्हणाले, “११ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करत आहेत आणि धोरणे आखत आहेत. त्यांच्या धोरणांमधून सामाजिक न्यायाची अंमलबजावणी दिसून येते.”
“वंदे मातरम्” चर्चेच्या वेळापत्रकानुसार, लोकसभेत एकूण १० तासांपैकी सत्ताधारी एनडीए सदस्यांना तीन तास देण्यात आले आहेत. या गाण्याबाबत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये मतभेद असल्याने “वंदे मातरम्” वरील चर्चा तापण्याची शक्यता आहे. राज्यसभेचे अधिवेशन मंगळवारी होणार आहे. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चर्चेला सुरुवात करतील, त्यानंतर आरोग्यमंत्री आणि सभागृह नेते जेपी नड्डा भाषण देतील. Parliament Winter Session।





