Parliament Monsoon Session 2025 : “पहलगाममध्ये दहशतवादी कसे घुसले”; काँग्रेस खासदाराचा मोदी सरकारवर पलटवार

Parliament Monsoon Session 2025 – सरकार 2016 मध्ये जी विधाने करत होती, तीच विधाने आता पुन्हा करत आहे. पुलवामा हल्ल्यानंतरही अशीच विधाने करण्यात आली होती. पहलगाम दहशतवादी हल्ला कसा झाला आणि दहशतवादी कसे घुसले? हे सरकारने सांगितले नाही, असे म्हणत कॉंगेसचे खासदार गौरव गोगोई यांनी मोदी सरकारवर पलटवार केला.
गौरव गोगोई म्हणाले, उरी हल्ला हा सर्वात वेदनादायक हल्ला होता. उरी आणि पुलवामानंतर पहलगाममध्ये सर्वात भयानक हल्ला झाला आहे. पाकिस्तानची इतकी हिंमत कशी झाली की तो वारंवार हल्ले करत आहे? पहलगाम हल्ल्याला 100 दिवस उलटून गेले आहेत.
परंतु हे सरकार दहशतवाद्यांना न्यायाच्या कचाट्यात आणू शकलेले नाही. तसेच पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकार उपराज्यपालांच्या मागे लपू शकत नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्यात झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यावी आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान किती भारतीय विमाने पाडण्यात आली हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.





