Paris Football Riots : पीएसजीच्या ऐतिहासिक विजयानंतर पॅरिसमध्ये हिंसाचार! दुकानांची तोडफोड अन् गाड्या पेटवल्या, पाहा VIDEO
Paris Football Riots : पीएसजीच्या चॅम्पियन्स लीग विजयानंतर पॅरिसमध्ये सुरू असलेला जल्लोष हिंसक वळणावर गेला. आर्सेनलला हरवल्यानंतर २०,००० चाहते रस्त्यावर उतरले, तसेच तोडफोड आणि जाळपोळ झाली, ज्यानंतर अनेकांना ताब्यात घेण्यात आले.

Paris Riots UEFA Champions League : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. पॅरिस सेंट-जर्मेन या फुटबॉल क्लबने त्याचे दुसरे ‘युईएफए चॅम्पियन्स लीग’चे विजेतेपद जिंकल्यानंतर संपूर्ण शहरात एकच जल्लोष सुरू झाला. मात्र, अवघ्या काही वेळातच या विजयाच्या आनंदाला हिंसक गालबोट लागले. पॅरिसच्या रस्त्यांवर फॅन्सनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, तोडफोड आणि जाळपोळ सुरू केल्यामुळे पोलिसांना तात्काळ हस्तक्षेप करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी डझनभर हुल्लडबाजांना ताब्यात घेतले आहे.
पेनल्टी शूटआऊटमध्ये आर्सेनलचा पराभव आणि जल्लोष!
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या एका अत्यंत रोमांचक आणि अटीतटीच्या फायनल सामन्यात ‘पीएसजी’ने पेनल्टी शूटआऊटमध्ये आर्सेनलचा पराभव करत चॅम्पियन्स लीगच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सामना संपताच पॅरिसमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. शहराचे प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या ‘आर्क डी ट्रायम्फ’ आणि ‘चॅम्प्स-एलिसीज’ परिसरात हजारो फॅन्स गोळा झाले. लोकांनी फटाके आणि फ्लेअर्स पेटवले, गाड्या घेऊन रस्त्यावर उतरले आणि सतत हॉर्न वाजवून आपला आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली.
PARÍS SIGUE EN LA CIMA 🏆
El París Saint-Germain vuelve a ser campeón de Europa.
Defendió en Budapest su Champions, hizo eterno e histórico un proyecto que domina con el vértigo y descontrol de Luis Enrique. Igualó al Arsenal (1-1) y la batalla fue a penaltis.
Gabriel lo… pic.twitter.com/U6pMzazOA2
— Eugenio Muñoz Fernández (@eugemf7) May 31, 2026
२० हजार लोकांची गर्दी अन् पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न!
🚨🇫🇷 It’s past 3 AM in Paris and there are no signs of things slowing down.
The PSG “celebrations” have rolled into the early morning hours with fires, looting, and clashes still ongoing.pic.twitter.com/WZdeECoqiP https://t.co/sLaaT7iKmr
— Mario Nawfal (@MarioNawfal) May 31, 2026
पॅरिस पोलिसांच्या माहितीनुसार, चॅम्प्स-एलिसीज परिसरात सुमारे २०,००० फॅन्स जमा झाले होते. सुरुवातीला सर्वकाही शांततेत सुरू होते, परंतु नंतर काही हुल्लडबाजांच्या गटांनी हिंसाचार सुरू केला. त्यांनी दुकानांची तोडफोड केली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आणि अनेक वाहने पेटवून दिली. या हिंसक चकमकीत एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पॅरिसमधील ८ व्या एरोन्डिसमेंट भागातील एका पोलीस स्टेशनवरही जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळेत कारवाई करत गर्दी पांगवली. तसेच आंदोलकांनी पॅरिसचा मुख्य रिंग रोडही काही काळ रोखून धरला होता.
८,००० पोलीस तैनात असूनही बेकरी आणि रेस्टॉरंट्सचे नुकसान
JUST IN: Rioters have set fire to vehicles and barricades at Parc des Princes after PSG’s victory.
Police are attempting to clear the way for firefighters as violence continues to spiral in Paris.pic.twitter.com/7Im815AV3o
— Remix News & Views (@RMXnews) May 30, 2026
या हिंसाचारामुळे शहरातील अनेक बेकरी आणि रेस्टॉरंट्सचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीएसजीच्या स्टेडियमजवळ १६ व्या एरोन्डिसमेंटमध्ये सुमारे १,००० लोकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना बॅरिकेड्स लावावे लागले. गेल्या वर्षी पीएसजीच्या पहिल्या चॅम्पियन्स लीग विजयानंतरही पॅरिसमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. हाच पूर्वेतिहास लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने आधीच ८,००० पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता, तरीही हुल्लडबाजांनी शहरात धुमाकूळ घातलाच.





