Cristiano Ronaldo Injury : ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालच्या संघातून बाहेर! वर्ल्ड कपपूर्वी दुखापतीचं सावट; कोचने दिली मोठी अपडेट
Cristiano Ronaldo Injury : मेक्सिको आणि अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी वर्ल्ड कप प्री-फ्रेंडली सामन्यांसाठी पोर्तुगालच्या संघात ख्रिस्तियानो रोनाल्डोचा समावेश करण्यात आलेला नाही.

Cristiano Ronaldo Injury Update FIFA World Cup 2026 : फुटबॉल जगतातील महाकुंभ म्हणजेच फिफा वर्ल्ड कप २०२६ सुरू होण्यापूर्वी पोर्तुगालच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो आगामी मैत्रीपूर्ण (Friendly) सामन्यांमधून बाहेर पडला असला, तरी चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमीही समोर आली आहे.
मेक्सिको आणि अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी वर्ल्ड कप प्री-फ्रेंडली सामन्यांसाठी पोर्तुगालच्या संघात ख्रिस्तियानो रोनाल्डोचा समावेश करण्यात आलेला नाही. ४१ वर्षीय रोनाल्डो फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून आपल्या ‘अल-नसर’ या क्लबसाठी देखील मैदानात उतरलेला नाही, त्यामुळे त्याच्या फिटनेसबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र पोर्तुगालच्या मुख्य प्रशिक्षकांनी रोनाल्डोच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे.
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने रोखलं –
पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, रोनाल्डोला हॅमस्ट्रिंगची (Hamstring Injury) समस्या जाणवत आहे. “ही एक किरकोळ दुखापत असून रोनाल्डो येत्या एक-दोन आठवड्यांत पुन्हा सरावाला सुरुवात करेल. या संपूर्ण हंगामात त्याने आपल्या फिटनेसवर जे काम केले आहे ते थक्क करणारे आहे, त्यामुळे त्याच्या शारीरिक क्षमतेबाबत सध्या तरी कोणतीही मोठी चिंता नाही,” असे मार्टिनेझ यांनी स्पष्ट केले.
⚽ @Cristiano Ronaldo es baja con Portugal para amistoso ante México por lesión muscular. Roberto Martínez confirma que no peligra su Mundial. @selecaoportugal #CristianoRonaldo #Portugal #México #Futbol #Amistoso #ÚltimaHora pic.twitter.com/hLITBfW54Y
— tabascoaldia (@tabascoaldiamx) March 21, 2026
वर्ल्ड कपमधील जागा पक्की –
रोनाल्डो या सामन्यांत खेळणार नसला तरी, फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम संघात त्याची जागा निश्चित असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले आहे. वर्ल्ड कपमध्ये रोनाल्डो आणि गोंसालो रामोस हे दोघेच फॉरवर्ड लाईनची धुरा सांभाळतील. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत नव्या खेळाडूंना आजमावून पाहण्याची ही शेवटची संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रुप-K मध्ये पोर्तुगालचा सामना कोणाशी?
फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये पोर्तुगालला ग्रुप-K मध्ये स्थान मिळाले आहे. या गटात पोर्तुगालसोबत कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे संघ आहेत. चौथ्या संघाचा निर्णय प्ले-ऑफमधून होणार असून, जमैका किंवा डीआर काँगोसारख्या संघांपैकी एक या गटात सामील होऊ शकतो.





