Paris Paralympics 2024 : भालाफेक नंतर उंच उडीतही भारताचा दुहेरी धमाका, शरद-मरियप्पन यांनी जिंकली पदके…

Paris Paralympics 2024 (Men’s High Jump T63 Final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी कायम आहे. पुरुषांच्या भालाफेक F46 स्पर्धेत अजित सिंगने 65.62 मीटरच्या वैयक्तिक थ्रोसह रौप्यपदक तर सुंदरसिंग गुर्जरने 64.96 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकत दुहेरी धमाका केला. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताने दुहेरी पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती.
त्यानंतर लगेगचच, उंच उडी टी63 (T63) स्पर्धेत भारताच्या शरद कुमार आणि मरियप्पन थांगावेलू यांनी पुन्हा एकदा दुहेरी धमाका केला आणि भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर टाकली. यासह भारताच्या पदकांची संख्या ही 20 वर पोहचली आहे.
अमेरिकेच्या एझरा फ्रेचला सुवर्ण…
वास्तविक, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये उंच उडी T63 स्पर्धेत शरद कुमार आणि मरियप्पन थांगावेलू यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. शरद कुमारने 1.88 मीटर उडी मारून दुसरा क्रमांक पटकावला तर मरियप्पन थांगावेलूने 1.83 मीटर उडी मारून तिसरा क्रमांक पटकावला.
4️⃣th September 2024. A Double Podium Finish Day for 🇮🇳. A Date to remember🤩#ParaAthletics: Men’s High Jump T63 Final
Sharad Kumar clinches #Silver with a #Paralympic record (T42 category) with a leap of 1.88m.
Meanwhile, 2-time Paralympic medallist Mariyappan Thangavelu… pic.twitter.com/eXzBSyEN6J
— SAI Media (@Media_SAI) September 3, 2024
अमेरिकेच्या एझरा फ्रेचने 1.94 मीटरच्या नवीन पॅरालिम्पिक विक्रमी उडीसह सुवर्णपदक जिंकले. मरियप्पन थांगावेलू, शैलेश कुमार आणि शरद कुमार हे तिघेही अंतिम फेरीत पोहचले होते त्यापैकी शरद आणि मरियप्पन यांना पदक जिंकण्यात यश आले.
Paris Paralympics 2024 : भालाफेकमध्ये भारताचा दुहेरी धमाका, ‘या’ 2 खेळाडूंनी मिळवली आणखी दोन पदके…
शरद-मरियप्पनची यंदाही चमकले…
शरद कुमारने गेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले होते आणि यावेळी त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा करत रौप्यपदक पटकावले. मरियप्पन थांगावेलू हा सलग तिसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने 2016 मध्ये सुवर्ण, 2020 मध्ये रौप्य आणि यावेळी कांस्यपदक जिंकले.





