Paris Paralympics 2024 : भालाफेकमध्ये भारताचा दुहेरी धमाका, ‘या’ 2 खेळाडूंनी मिळवली आणखी दोन पदके…

Paris Paralympics 2024 (Men’s Javelin Throw F46 Final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुंदर सिंग गुर्जर (Sundar Singh) आणि अजित सिंग (Ajeet Singh) यांनी भालाफेकच्या F46 स्पर्धेत भारतासाठी पदके जिंकली आहेत. भारताला एकाच स्पर्धेत दोन पदके मिळाली आहेत. अजित सिंगने 65.62 मीटरच्या वैयक्तिक थ्रोसह रौप्यपदक जिंकले, तर सुंदर सिंगने 64.96 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले. यासह भारताची पदकाची एकूण संख्या 18 वर पोहचली आहे. या स्पर्धेचे सुवर्णपदक क्युबाच्या वरोना गोन्झालोने पटकावले आहे. त्याने 66.14 मीटर फेक करून थेट सुवर्णपदक पटकावले.
भालाफेकच्या एफ46 (F46) स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे एकूण तीन खेळाडूं पात्र ठरले होते. ज्यामध्ये अजित सिंग आणि सुंदर सिंग गुर्जर यांनी पदके जिंकली. रिंकू पाचव्या स्थानावर राहिला. त्याने 61.58 मीटर भालाफेक केली.
𝐃𝐨𝐮𝐛𝐥𝐞 𝐃𝐞𝐥𝐢𝐠𝐡𝐭 𝐟𝐨𝐫 #𝐓𝐞𝐚𝐦𝐈𝐧𝐝𝐢𝐚🇮🇳 𝐢𝐧 #𝐏𝐚𝐫𝐚𝐀𝐭𝐡𝐥𝐞𝐭𝐢𝐜𝐬 𝐌𝐞𝐧’𝐬 𝐉𝐚𝐯𝐞𝐥𝐢𝐧 𝐓𝐡𝐫𝐨𝐰 𝐅𝟒𝟔 𝐅𝐢𝐧𝐚𝐥✅💯🥳
Major Chak De India moment at #ParisParalympics2024 as Ajeet Singh & Sundar Singh Gurjar clinched #Silver🥈and #Bronze🥉with… pic.twitter.com/qMcNiy3cOo
— SAI Media (@Media_SAI) September 3, 2024
अजित सिंगने केली दमदार कामगिरी…
अजित सिंगने पहिल्या प्रयत्नात 59.80 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 60.53 मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात 62.33 मीटर भालाफेक केली. अशा स्थितीत तो पदकाला मुकणार असे वाटत होते. मात्र पाचव्या थ्रोमध्ये त्याने 65.62 मीटर भालाफेक करत दुसरे स्थान मिळवताना रौप्यपदक जिंकले.
Paris Paralympics 2024 : धावपटू दीप्ती जीवनजीने पटकावले कांस्यपदक…
दुसरीकडे सुंदरसिंग गुर्जरने चांगली सुरुवात केली. त्याने पहिल्या प्रयत्नात 62.92 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 61.75 मीटर भालाफेक केली. पण नंतर त्याचे तीन थ्रो फाऊल झाले. त्याचा सर्वोत्तम थ्रो 64.96 होता आणि यासह तो कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला.





