Paris Paralympics 2024 (Shot Put) : वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करूनही रवी रोंगालीचे हुकलं पदक…

Paris Paralympics 2024 (Men’s Shot Put F40 final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताच्या रवी रोंगालीकडून पदक मिळवण्याची अपेक्षा होती, परंतु पुरुषांच्या F40 शॉट पुटच्या (गोळाफेक)अंतिम फेरीत तो पाचव्या स्थानावर राहिल्याने त्याचे पदक हुकले. गेल्या वर्षी चीनमधील आशियाई पॅरा गेम्समध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या रवीने 10.63 मीटर अशी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असली तरी ती पहिल्या तीनमध्ये पोहोचण्यासाठी पुरेशी नव्हती.
Result Update: #ParaAthletics Men’s Shot Put – F40 Final👇
Ravi Rongali misses out on a podium finish💔
Despite putting up a strong performance in the finale, Ravi finishes 5th position with a Personal Best throw of 10.63
Take a bow, Ravi for putting up such an inspirational… pic.twitter.com/WdnEMniE9y
— SAI Media (@Media_SAI) September 1, 2024
जागतिक विक्रम धारक पोर्तुगालच्या मिगुएल मॉन्टेरोने 11.21 मीटरसह सुवर्णपदक जिंकले, तर मंगोलियाच्या बटुल्गा त्सेग्मिड (11.09 मी) ने रौप्यपदक जिंकले. विद्यमान आशियाई पॅरा गेम्स चॅम्पियन इराकच्या गरह तनय्याशने 11.03 मीटरसह कांस्यपदक जिंकले.
Paris Paralympics 2024 : मनीषा पाठोपाठ नित्या सिवनही उपांत्य फेरीत दाखल….
तर टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि सध्याचा जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियन रशियाचा डेनिस ग्नेझडिलोव्ह 10.80 मीटरसह चौथ्या स्थानावर राहिला. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तो तटस्थ खेळाडू म्हणून सहभागी झाला आहे.


