Paris Paralympics 2024 : बॅडमिंटनमधून आनंदाची बातमी, मनीषा रामदास उपांत्य फेरीत दाखल…

Paris Paralympics 2024 (Badminton Women’s Singles SU5 QF) : भारतीय बॅडमिंटनपटू मनीषा रामदास हिने एसयू5 (SU5) प्रकारात महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठून पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत, मात्र दुसरीकडे अन्य भारतीय बॅडमिंटनपटू मनदीप कौर आणि पलक कोहली यांनी रविवारी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आपापल्या लढती गमावल्याने त्यांचे पॅरालिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या मामिको टोयोडाला 21- 13, 21-16 असे पराभूत करताना 19 वर्षीय मनीषाला कोणतीही अडचण आली नाही. दुसऱ्या मानांकित भारतीय खेळाडूने तिच्या बिगरमानांकित प्रतिस्पर्ध्याला अवघ्या 30 मिनिटांत पराभूत केलं. पुढच्या फेरीत तिच्या समोर आता भारताच्याच तुलसीमथी मुरुगेसनचे आव्हान असणार आहे. यामुळे भारताचे अजून एक पदक निश्चित झाले आहे. हा सामना सोमवारी (1 सप्टेंबर) भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 2.00 वाजता सुरू होईल.
🇮🇳 Result Update: #ParaBadminton🏸 Women’s Singles SU5 QF👇
Manisha Ramadass continues her winning spree at the #ParisParalympics2024
After winning both her group stage matches, Manisha cruised past Japan’s Mamiko Toyoda 2-0 in straight games with a scoreline of 21-13 & 21-16.… pic.twitter.com/oktDAev8eV
— SAI Media (@Media_SAI) September 1, 2024
मनदीप- पलकचे आव्हान संपुष्टात ..
भारताची शटलर मानदीप कौरला उपांत्यपूर्व फेरीत नायजेरियाच्या मरियम बोलाजीकडून 21-8, 21-9 असे पराभूत व्हावे लागल्याने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताचाही दुसरी शटरल पलक कोहली देखील पराभूत झाली आहे. पलकला इंडोनेशियाच्या खलिमतुस सादियाहने 21-19, 21-15 असे पराभूत केले.
Paris Paralympics 2024 : मनदीप कौर पाठोपाठ ‘पलक कोहली’चेही आव्हान संपुष्टात….
दरम्यान, याच स्पर्धेत SL4 प्रकारातील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत सुहास यथीराज आणि सुकांत कदम हे दोन भारतीय खेळाडू आमनेसामने असतील. तर SL3 प्रकारातील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत नितीश कुमारचा सामना जपानच्या डायसुके फुजिहाराशी होईल.





