Paris Paralympics 2024 (Closing Ceremony) : हरविंदर व प्रीती पाल भारताचे ध्वजवाहक…

Paris Paralympics 2024 (Closing Ceremony) : – पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा तिरंदाज हरविंदर सिंग व दोन पदक जिंकणारी प्रीती पाल यांची समारोप सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Harvinder Singh and Preethi Pal will be India’s flag-bearers at the Paralympics 2024 closing ceremony)
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये हरविंदरने कांस्य कामगिरी केली होती. त्यानंतर पॅरिस येथे देखील ३३ वर्षांच्या हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावताना इतिहास रचला. हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मानाचा क्षण असल्याचे हरविंदरने बोलताना सांगितले.
भारतासाठी सुवर्ण जिंकायचे होते, ते स्वप्न पूर्ण झाले असून त्यानंतर समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून माझी निवड करण्यात आली आहे, हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याचे हरविंदरने सांगितले.
Paris Paralympics 2024 : प्रवीण कुमारची ‘सुवर्ण उडी’, High Jump T64 स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल…
भारताच्या प्रीती पालने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये २ कांस्यपदके जिंकली आहेत. माझ्यासाठी ध्वजवाहक हा सन्मान असून हा केवळ माझा सन्मान नसून सर्व खेळाडूंचा आहे, ज्यांनी आपल्या क्षमतेला अनुसरून खेळ करताना भारताला पदक मिळवून दिले आहे, असे बोलताना प्रीती म्हणाली. या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतपर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे.





