Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कधी,कुठे आणि कसं पाहाल? जाणून घ्या, सर्व डिटेल्स एका क्लिकवर…

Paris Paralympics 2024 Opening Ceremony Live : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धा आज (28 ऑगस्ट) पासून सुरू होत आहे. त्याचबरोबर या मेगा इव्हेंटचा समारोप 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासह 170 देशांतील 4,000 हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. मात्र, हे खेळ सुरू होण्यापूर्वी रंगतदार उद्घाटन सोहळा होणार आहे. हा उद्घाटन सोहळा आज होणार आहे. पण पॅरिस पॅरालिम्पिकचा उद्घाटन सोहळा भारतीय चाहत्यांना कधी आणि कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या, या संबंधित सर्व डिटेल्स….
उद्घाटन सोहळा कधी, कुठे आणि कसा बघता येईल?
पॅरालिम्पिक खेळांचा उद्घाटन सोहळा पॅरिसमधील सीन नदीच्या काठावर आज (28 ऑगस्ट ) होणार आहे. स्पोर्ट्स18 नेटवर्कवर भारतीय चाहते हा सोहळा थेट पाहू शकतात. तसेच जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाईल. पॅरिसमध्ये उद्घाटन सोहळा 8 वाजता सुरू होणार असला तरी भारतीय वेळेनुसार तो रात्री 11.30 वाजता सुरू होईल. चाहत्यांना जिओ सिनेमावर विविध भाषांमध्ये उद्घाटन सोहळा पाहता येणार आहे. या उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक सुमित अंतिल आणि भाग्यश्री यादव असतील.
4400 खेळाडू सहभागी..
पॅरालिम्पिक गेम्ससाठी जगभरातून पॅरा ॲथलीट येथे पोहचले आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा आजपासून (28 ऑगस्ट) ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेतील 22 खेळांमध्ये 4400 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 549 पदके असतील, त्यापैकी 236 पदके महिलांसाठी असतील.
Asian Champions Trophy 2024 : भारतीय हॉकी संघाची घोषणा, ‘हे’ 18 खेळाडू चीनमध्ये दाखवतील आपली ताकद…
भारताची दावेदारी किती मजबूत…
या मेगा स्पर्धेसाठी भारताने 84 खेळाडूंचा संघ पाठवला आहे. एकूण 12 खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभाग नोंदवतील. भारतातील जास्तीत जास्त 38 खेळाडू ॲथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय 13 भारतीय खेळाडू बॅडमिंटनमध्ये आणि 10 नेमबाजीमध्ये आपली दावेदारी सादर करतील. उल्लेखनीय आहे की, यापूर्वी भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 54 खेळाडूंचा संघ पाठवला होता, या खेळाडूंनी 9 खेळांमध्ये सहभाग घेतला होता. ज्यामध्ये भारताला एकूण 19 पदके मिळाली होती. मात्र, यावेळी भारतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकपेक्षा अधिक पदके जिंकू शकतील, असे मानले जात आहे. मात्र, यावेळी भारतीय पॅरा ॲथलीट्स कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





