Asian Champions Trophy 2024 : भारतीय हॉकी संघाची घोषणा, ‘हे’ 18 खेळाडू चीनमध्ये दाखवतील आपली ताकद…

Asian Champions Trophy 2024 (Team India) :- चीनमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. हरमनप्रीत सिंगकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. 33 व्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून देणाऱ्या संघातील 10 खेळाडूंचा समावेश या संघात करण्यात आला असून पाच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
येत्या 8 ते 17 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाची पहिली लढत 8 सप्टेंबर रोजी यजमान चीन संघाशी असणार आहे. यानंतर त्यांना जपान (9 सप्टेंबर), मलेशिया (11 सप्टेंबर), कोरिया (12 सप्टेंबर) आणि पाकिस्तान (14 सप्टेंबर) विरुद्ध खेळायचे आहे. सेमीफायनल 16 सप्टेंबरला तर फायनल 17 सप्टेंबरला होणार आहे. गतवेळेस या स्पर्धेचे विजेतेपद भारताने पटकावले होते. अंतिम लढतीत भारताने मलेशिया संघाला पराभूत करताना विजयी मुकुट परिधान केला होता. त्यामुळे या स्पर्धेत देखील भारतीय संघाचे पारडे जड असणार आहे.
Indian Men’s team in BACK in action!
After a bronze medal winning performance at the Paris Olympics, 2️⃣0️⃣2️⃣4️⃣
Our Men’s team is geared up to take their next challenge
Men’s Asian Champions Trophy 2024 starts from 8th, September 2024. Hulunbuir City, Inner Mongolia, China.
You… pic.twitter.com/NTAOx3qGYR— Hockey India (@TheHockeyIndia) August 28, 2024
भारताची भिंत समजला जाणारा गोलकीपर श्रीजेशने ऑलिम्पिकनंतर निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी कृष्ण बहादूर पाठक व सूरज करकेरा यांची गोलकिपर म्हणून निवड करण्यात आली आहे. अनुभवी मिडफिल्डर विवेक सागर प्रसादला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. नियमित उपकर्णधार हार्दिक सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, समशेर सिंग आणि गुरजंत सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ :
गोलकिपर : कृष्ण बहादुर पाठक, सूरज करकेरा
बचावफळी : जरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह (कर्णधार), जुगराज सिंह, संजय, सुमित
मध्यफळी : राज कुमार पाल, नीलकंठ शर्मा, विवेक सागर प्रसाद (उपकर्णधार), मनप्रीत सिंह, मोहम्मद राहील मौसीन
आघाडी : अभिषेक, सुखजीत सिंह, अरिजीत सिंह हुंदल, उत्तम सिंह, गुरजोत सिंह





