Paris Paralympics 2024 : निषाद कुमारची अप्रतिम कामगिरी, उंच उडीत जिंकले रौप्यपदक…

Paris Paralympics 2024 (Men’s High Jump T47 Final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम आहे. भारतीय धावपटू निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडीत टी47 (T47) प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. निषादने या मोसमात 2.04 मीटरची सर्वोत्तम उडी मारली. यासह भारताने या पॅरालिम्पिकमध्ये सातवे पदक जिंकले आहे. त्याचबरोबर ॲथलेटिक्समधील भारताचे हे तिसरे पदक आहे.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 2.06 मीटर उडी मारणाऱ्या निषादने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये केवळ 2.04 मीटर उडी मारली होती, तरीही तो रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरला. निषाद याने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही या स्पर्धेत रौप्यपदकच जिंकले होते. यासह, बॅक-टू-बॅक पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पॅरा-ॲथलीट ठरला आहे.
Silver Medallist Nishad! 🥈#ParaAthletics: Men’s High Jump T47 Final
Tokyo Silver medallist Nishad Kumar 🇮🇳 repeats his feats, clinches India’s 7th medal at #ParisParalympics2024, securing a Season Best with a leap of 2.04 metres.
With this achievement, he secured his second… pic.twitter.com/mIjBCA5ezi
— SAI Media (@Media_SAI) September 2, 2024
पुरुषांच्या उंच उडीत (T47) अमेरिकेचा रॉड्रिक टाऊनसेंड 2.12 मीटरसह पहिल्या स्थानी राहिला. त्याने सुवर्णपदकावर कब्जा केला. टाऊनसेंडने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.
Paris Paralympics 2024 : प्रीती पालचे दुसरे पदक, 200 मीटर शर्यतीतही पटकावलं कांस्य..
रॉडरिक टाउनसेंड आणि निषाद कुमार यांच्याशिवाय, तटस्थ पॅरालिम्पिक अॅथलीट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जॉर्जी मार्गीव्हने 2 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह कांस्यपदक जिंकले. दरम्यान, आणखी एक भारतीय उंच उडीपटू राम पाल यानेही (1.95 मीटर) चांगली कामगिरी केली. मात्र, तो सातव्या क्रमांकावर राहिला.





