Paris Paralympics 2024 : प्रीती पालचे दुसरे पदक, 200 मीटर शर्यतीतही पटकावलं कांस्य..

Paris Paralympics 2024 (Women’s 200 m – T35 Final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (1 सप्टेंबर) भारतीय अॅथलीट्सने आपली ताकद दाखवून देशासाठी सहावे पदक जिंकले.
वास्तविक भारतीय पॅरा ॲथलीट प्रीती पालने चमकदार कामगिरी करत महिलांच्या 200 मीटर शर्यतीतील टी35 (T35) प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. प्रितीने अंतिम फेरीत आपली सर्वोत्तम कामगिरी करत म्हणजेच 30.01 सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि तिसरे स्थान मिळवण्यात ती यशस्वी ठरली.
Medal Alert!🏅
Women’s 200 m – T35 Final
After winning her first medal at the #ParisParalympics2024, Preeti Pal secures yet another medal for India, clinching a #Bronze medal🥉 with a personal best timing of 30.01 seconds.
With this win, she becomes the first track and field… pic.twitter.com/UjhYMFRj6T
— SAI Media (@Media_SAI) September 1, 2024
पॅरिस पॅरालिम्पिकमधील प्रितीचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी तिने महिलांच्या 100 मीटर टी35 (T35) प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. 23 वर्षीय प्रीतीचे कांस्यपदक हे पॅरिसमधील पॅरा ॲथलेटिक्समधील भारताचे दुसरे पदक आहे. यासह ती पॅरालिम्पिक स्पर्धेच्या ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 2 पदके जिंकणारी भारतातील पहिली महिला ठरली आहे.
Paris Paralympics 2024 : नेमबाज रुबिनाची कांस्यपदकाला गवसणी, भारताची पदकसंख्या पोहचली 5 वर ….
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकावण्यापूर्वी प्रितीने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही देशाचे नाव उंचावले आहे. 2024 मध्ये जपानमध्ये झालेल्या त्या स्पर्धेतही तिने कांस्यपदक जिंकले होते. आणि, आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये एकामागून एक दोन पदके जिंकून भारताला अभिमानाने आनंद साजरा करण्याची दुहेरी संधी तिने दिली आहे.





