Paris Paralympics 2024 : मनदीप कौर पाठोपाठ ‘पलक कोहली’चेही आव्हान संपुष्टात….

Paris Paralympics 2024 (Badminton Women’s Singles SL3 QF) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या चौथ्या दिवसाची म्हणजेच रविवारची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नाही. भारतीय पॅरा शटलर्स मनदीप कौर नंतर आता पलक कोहली हिलासुध्दा उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्विकारावा लागला आहे. यासह पॅरिस पॅरालिम्पिकमधील दोन्ही खेळाडूंचा प्रवास संपला आहे.
रविवारी महिला एकेरीच्या एसएल3 (SL3) प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीत मनदीप कौरला नायजेरियन खेळाडू मरियम बोलाजीकडून 21-8, 21-9 असा पराभव पत्करावा लागला.
🇮🇳 Result Update: #ParaBadminton🏸 Women’s Singles SL4 QF👇
Another heartbreak 💔 for 🇮🇳 in Para #Badminton as Palak Kohli also bows out of #ParisParalympics2024 following her defeat against Indonesia’s K Sadiyah 0-2 with a scoreline of 19-21, 15-21
Stay tuned for the latest… pic.twitter.com/o2CVzScOV5
— SAI Media (@Media_SAI) September 1, 2024
त्यानंतर झालेल्या अन्य लढतीत भारताची पॅरा शटलर पलक कोहली हिलासुध्दा महिला एकेरीच्या एसएल3 (SL4) प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. तिला इंडोनेशियन ॲथलीट सादियाह खलिमातसने 21-19, 21-15 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.
Paris Paralympics 2024 : भारतीय पॅरा शटलर्स मनदीप कौरचे आव्हान संपुष्टात….
दरम्यान, यावर्षी भारताने पॅरालिम्पिकसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवली आहे, ज्यामध्ये 12 खेळांमधील 84 खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदके जिंकली आहेत.





