Paris Paralympics 2024 : भारताच्या पदकांचे अष्टक, योगेश कथुनियाने ‘डिस्कस थ्रो’मध्ये पटकावले रौप्य…

Paris Paralympics 2024 (Men’s Discus Throw F56 event) : भारताच्या योगेश कथुनियाने सोमवारी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) एफ56 (F56) स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमधले भारताचे हे 8वे पदक तर पॅरा-ॲथलेटिक्समधील चौथे पदक ठरले.
योगेशने स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर 42.22 मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रोसह आपल्या यशाची पुनरावृत्ती केली. योगेशने 6 प्रयत्नांपैकी पहिल्याच प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी केली. यापूर्वी, त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये देखील रौप्य पदक जिंकले होते. टोकियोमध्ये त्याने 44.38 मीटर थ्रो केला होता.
The charm of doubles😍
Yogesh Kathuniya seals his second silver medal at the #Paralympics🥳🥳
He starred in the Men’s Para #DiscussThrow F56 category final with a season best throw of 42.22m and bagged #Silver🥈at #ParisParalympics2024 🥳💯
Congratulations Yogesh for your… pic.twitter.com/BWmMfVldhl
— SAI Media (@Media_SAI) September 2, 2024
आपल्या कारकिर्दीत अनेक पदके जिंकणारा भारतीय पॅरा-ॲथलीट योगेशचे लक्ष्य सुवर्णपदकाचे होते. पण ब्राझीलच्या क्लॉडिन बॅटिस्टाने 46.86 मीटर फेक करून पॅरालिम्पिक विक्रम नोंदवून सुवर्णपदक जिंकले. तर ग्रीसच्या कोन्स्टँटिनोस त्झोनिसने 41.32 मीटरच्या प्रयत्नाने कांस्यपदक जिंकले. योगेशने त्याच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रोने चांगली सुरुवात केली होती, परंतु त्याच्या उर्वरित 5 प्रयत्नांमध्ये तो त्याच्या मागील प्रयत्नापेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही.
Paris Paralympics 2024 : निषाद कुमारची अप्रतिम कामगिरी, उंच उडीत जिंकले रौप्यपदक…
2018 मध्ये, योगेशने बर्लिन येथील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये 45.18 मीटर डिस्कस फेकून एफ36 (F36) प्रकारात विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. या कामगिरीमुळे पॅरा ॲथलेटिक्समधील त्याच्या उल्लेखनीय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्याने टोकियो येथे 2020 पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो (F56) स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते, या कामगिरीमुळे त्याला 2021 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता.





