Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये कोणत्या राज्यातील किती खेळाडूचा आहे सहभाग? हरियाणाचे वर्चस्व कायम, जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती…

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. भारत जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तुकडीसह सज्ज आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची ही 26 वी उपस्थिती असेल. भारतीय संघात 117 खेळाडूंचा समावेश आहे. ही बहुराष्ट्रीय स्पर्धा पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
भारताने आतापर्यंत जिंकली आहेत 35 पदके…
भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकूण 35 पदके जिंकली आहेत. यामध्ये 10 सुवर्ण, नऊ रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 हे भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात चांगले ऑलिम्पिक राहिले होते, ज्यामध्ये देशाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण सात पदके जिंकली. यावेळी भारतीय खेळाडू आपल्या देशाला दुहेरी अंकात नेण्याचा प्रयत्न करतील.
हरियाणाचा पुन्हा दबदबा
हांगझोऊ आशियाई खेळ 2022 आणि त्यापूर्वीच्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल खेळांप्रमाणे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सर्वाधिक खेळाडू हे हरियाणाचे असतील . या राज्यातील 24 खेळाडू पॅरिसमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. यानंतर शेजारचा पंजाब 19 खेळाडूंसह दुसऱ्या स्थानावर आहे तर दक्षिणेकडील राज्य तामिळनाडू 13 खेळाडूंसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर महाराष्ट्राचे केवळ 5 खेळाडू यंदा ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा करताना दिसतील. यावरून असे दिसून येते की, भारतातील प्रत्येक राज्यात मोठ्या संख्येनं प्रतिभाशाली खेळाडू उपलब्ध आहेत.
प्रत्येक राज्यातून पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरलेल्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर टाकूया…
महाराष्ट्र(5 खेळाडू)
1. प्रवीण जाधव (तिरंदाजी- पुरुष वैयक्तिक)
2. अविनाश साबळे (अॅथलेटिक्स- 3000 मी. स्टीपलचेस)
3. सर्वेश कुशारे (अॅथलेटिक्स- उंच उडी)
4. चिराग शेट्टी (बॅडमिंटन- पुरुष दुहेरी)
5. स्वप्नील कुसाळे (नेमबाजी- 50 मी. रायफल 3 पोझिशन्स)
हरियाणा (24 खेळाडू)
1. भजन कौर (तिरंदाजी,महिला वैयक्तिक, सांघिक)
2. किरण पहल- (अॅथलेटिक्स,महिला 400 मी, 4×400 मी रिले)
3. नीरज चोप्रा- (अॅथलेटिक्स-पुरुष भालाफेक)
4. अमित पंघाल (बॉक्सिंग-पुरुष 51 किलो)
5. जस्मिन लांबोरिया( बॉक्सिंग-महिला 57 किलो)
6. निशांत देव (बॉक्सिंग -पुरुष 71 किलो)
7. प्रीती पवार (बॉक्सिंग -महिला 54 किलो)
8. दिक्षा डागर (गोल्फ-महिला वैयक्तिक)
9. संजय (हॉकी-पुरुष संघ)
10 सुमित (हॉकी -पुरुष संघ)
11. बलराज पनवार (रोइंग-एकेरी स्कल्स)
12. अनिश भानवाला (नेमबाजी, 25 मी रॅपिड फायर पिस्तूल)
13. मनू भाकर (नेमबाजी 10,25 मी. एअर पिस्तूल)
14. रमिता जिंदाल (नेमबाजी 10 मी. एअर रायफल(मिश्र))
15. रायझा धिल्लन (नेमबाज स्कीट शूटिंग)
16. रिदम सांगवान (नेमबाजी, 10 मी. एअर पिस्तूल(मिश्र))
17. सरबज्योत सिंग (नेमबाजी, 10 मी. एअर पिस्तूल(मिश्र))
18. सुमित नागल (टेनिस, पुरुष एकेरी)
19. अमन सेहराव (कुस्ती, फ्रीस्टाइल 57 किलो)
20. अंशू मलिक (कुस्ती, महिला 57 किलो)
21. अंतिम पंघाल (कुस्ती- महिला 53 किलो)
22. निशा दहिया (कुस्ती, महिला 68 किलो
23. रितिका हुड्डा(कुस्ती, महिला 76 किलो)
24. विनेश फोगट (कुस्ती,महिला 50 किलो)
पंजाब (19 खेळाडू)
1.अक्षदीप सिंग (अॅथलेटिक्स,20 किमी चालणे)
2.तजिंदरपाल तूर (अॅथलेटिक्स, शॉट पुट)
3. विकास सिंग (अॅथलेटिक्स, 20 किमी चालणे)
4. गगनजीत भुल्लर (गोल्फ,वैयक्तिक)
5. गुरजंत सिंग (हॉकी, पुरुष संघ)
6. हार्दिक सिंग (हॉकी, पुरुष संघ)
7. हरमनप्रीत सिंग (हॉकी, पुरुष संघ)
8. जर्मनप्रीत सिंग (हॉकी, पुरुष संघ)
9. जुगराज सिंग (हॉकी, पुरुष संघ)
10. मनदीप सिंग( हॉकी, पुरुष संघ)
11. मनप्रीत सिंग(हॉकी, पुरुष संघ)
12. समशेर सिंग (हॉकी, पुरुष संघ)
13. सुखजित सिंग (हॉकी, पुरुष संघ)
14. अंजुम मौदगील( नेमबाजी, ५० मी रायफल)
15. अर्जुन चीमा (नेमबाजी, 10 मी. एअर पिस्तूल)
16. सिफ्ट कौर समरा(नेमबाजी- 50 मी. रायफल 3 पोझिशन्स)
17. संदीप सिंग (नेमबाजी, 10 मी. एअर रायफल)
18. प्राची चौधरी (अॅथलेटिक्स- राखीव)
19. कृष्ण बहादुर पाठक (पुरुष, हॉकी संघ)
तामिळनाडू (13 खेळाडू)
1.जेसविन आल्ड्रिन (अॅथलेटिक्स- लांब उडी)
2. प्रवीण चित्रवेल (अॅथलेटिक्स- तिहेरी उडी)
3.राजेश रमेश- (अॅथलेटिक्स- 4×400 मी. रिले)
4. संतोष तमिलरासन- (अॅथलेटिक्स- 4×400 मी. रिले)
5. सुभा वेंकटेशन- (अॅथलेटिक्स- 4×400 मी. रिले)
6. विथ्या रामराज- (अॅथलेटिक्स- 4×400 मी. रिले)
7.नेत्रा कुमनन (नौकानयन- वन पर्सन डिंगी)
8. विष्णू सरवणन (नौकानयन- वन पर्सन डिंगी)
9. इलावेनिल वालारिवन (नेमबाजी- 10 मी. एअर रायफल)
10. पृथ्वीराज तोंडैमन (नेमबाजी- पुरुष ट्रॅप)
11.जी.साथियान (टेबल टेनिस- रिझर्व्ह)
12.शरथ कमल (टेबल टेनिस- पुरुष एकेरी, सांघिक)
13. एन. बालाजी (टेनिस- पुरुष दुहेरी)
कर्नाटक (7 खेळाडू)
1.पूवम्मा एमआर (अॅथलेटिक्स, महिला 4×400मी रिले)
2. अश्विनी पोनप्पा (बॅडमिंटन, महिला दुहेरी)
3. अदिती अशोक (गोल्फ, महिला वैयक्तिक)
4. श्रीहरी नटराज (जलतरण, पुरुष 100 मीटर बॅकस्ट्रोक)
5.धिनिधी देसिंघू (जलतरण, महिला 200 मी फ्रीस्टाइल)
6. अर्चना कामथ (टेबल टेनिस, महिला संघ)
7. रोहन बोपण्णा (टेनिस, पुरुष दुहेरी)
उत्तर प्रदेश (7 खेळाडू)
1. अन्नू राणी (अॅथलेटिक्स, महिला भालाफेक)
2.पारुल चौधरी (अॅथलेटिक्स महिला 3000 मी स्टीपलचेस, महिला 5000 मी.)
3. प्रियांका गोस्वामी (अॅथलेटिक्स महिला 20 किमी रेस वॉक, मॅरेथॉन रेस वॉक मिश्र रिले)
4. राम बाबू (अॅथलेटिक्स, पुरुषांची 20 किमी रेस वॉक)
5. शुभंकर शर्मा (गोल्फ, पुरुष वैयक्तिक)
6. ललित कुमार उपाध्याय (पुरुष, हॉकी संघ )
7. राजकुमार पाल (पुरुष, हॉकी संघ)
Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकसाठी पात्र होऊनही आभा कठुआला वगळले..! जाणून घ्या, कारण….
केरळ( 6 खेळाडू)
1. अब्दुल्ला अबुबकर (अॅथलेटिक्स पुरुषांची तिहेरी उडी)
2. मोहम्मद अजमल (अॅथलेटिक्स पुरुषांची 4×400 मीटर रिले)
3. मोहम्मद अनस (अॅथलेटिक्स पुरुषांची 4×400 मीटर रिले)
4. मिझो चाको कुरियन (अॅथलेटिक्स, रिझर्व्ह)
5. पीआर श्रीजेश (पुरुष हॉकी संघ)
6. एचएस प्रणय (बॅडमिंटन पुरुष एकेरी)
आंध्र प्रदेश( 4 खेळाडू)
1. धीरज बोम्मादेवरा (तिरंदाजी, पुरुष वैयक्तिक आणि पुरुष संघ)
2. ज्योती याराजी अॅथलेटिक्स (महिला 100 मीटर अडथळा)
3. ज्योतिका श्री दांडी अॅथलेटिक्स (महिला 4×400 मीटर रिले)
4. सात्विकसाईराज रँकीरेड्डी (बॅडमिंटन, पुरुष दुहेरी)
उत्तराखंड (4 खेळाडू)
1. अंकिता ध्यानी (ॲथलेटिक्स, महिला 5000 मी शर्यत)
2. परमजीत बिश्त (अॅथलेटिक्स, पुरुषा 20 किमी रेस वॉक)
3. सूरज पनवार (ॲथलेटिक्स, मॅरेथॉन शर्यत वॉक मिश्र रिले)
4. लक्ष्य सेन (बॅडमिंटन, पुरुष एकेरी)
दिल्ली (4 खेळाडू)
1. अमोज जेकब (अॅथलेटिक्स, पुरुषांची 4×400 मीटर रिले)
2. तौलिका कॉम्प्रा (ज्युडो, महिला 78 किलो)
3. राजेश्वरी कुमारी (नेमबाजी, महिला ट्रॅप)
4. मनिका बत्रा (टेबल टेनिस, महिला एकेरी, सांघिक)
मध्य प्रदेश (2 खेळाडू)
1. विवेक सागर प्रसाद (पुरुष हॉकी संघ)
2. ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (नेमबाजी, पुरुष 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स)
मणिपूर (2 खेळाडू)
1. मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग, महिला 49 किलो)
2. नीलकांत शर्मा (पुरुष हॉकी संघ
ओडिशा(2 खेळाडू)
1. अमित रोहिदास (पुरुष हॉकी संघ)
2. किशोर जेन्ना (अॅथलेटिक्स ,पुरुष भालाफेक)
राजस्थान( 2 खेळाडू)
1.अनंतजित सिंग नारुका (नेमबाजी पुरुष स्कीट, स्कीट मिश्र संघ)
2. माहेश्वरी चौहान (नेमबाजी महिला स्कीट, स्कीट मिश्र संघ)
गुजरात (2 खेळाडू)
1.हरमीत देसाई (टेबल टेनिस, पुरुष एकेरी, सांघिक)
2. मानव ठक्कर (टेबल टेनिस, पुरुष संघ)
आसाममधील (1 खेळाडू)
1. लोव्हलिना बोर्गोहेन (बॉक्सिंग, महिला 70 किलो)
सिक्कीम( 1 खेळाडू)
1. तरुणदीप राय (तिरंदाजी, पुरुष वैयक्तिक, पुरुष संघ)
झारखंड (1 खेळाडू)
1. दीपिका कुमारी (तिरंदाजी, महिला वैयक्तिक, महिला संघ)






