Vinesh Phogat Prize Money : काय, विनेश फोगटला बक्षीस म्हणून 16 कोटी मिळाले? जाणून घ्या, व्हायरल दाव्याचे सत्य…

Vinesh Phogat Prize Money Viral Post : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचे पुनरागमन झाल्यानंतर तिचे भव्य शैलीत स्वागत करण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश पदक जिंकू शकली नाही. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी तिला अपात्र ठरवण्यात आले. आता सोशल मीडियावर विनेशची एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये विनेशला 16 कोटींहून अधिक बक्षीस मिळाल्याचा दावा केला जात आहे. पण या दाव्याचे सत्य काही वेगळेच आहे. विनेशचे पती सोमवीर राठी यांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
वास्तविक, विनेशसाठी असा दावा केला जात आहे की, तिला देशातील विविध संस्थांकडून बक्षिसाची रक्कम देण्यात आली आहे. विनेशला हरियाणा व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय जाट महासभा आणि पंजाब जाट असोसिएशनने प्रत्येकी 2 कोटी रुपये दिले आहेत. अशाप्रकारे व्हायरल पोस्टमध्ये नमूद केलेली एकूण रक्कम 16 कोटी 30 लाख रुपये आहे. मात्र विनेशचे पती सोमवीर राठी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. एक्स (X) वर पोस्ट शेअर करून त्यांनी हे चुकीचे असल्याचे सांगितले आहे.
निम्नलिखित संस्थाओं, व्यापारियों, कंपनियों और पार्टियों द्वारा विनेश फोगाट को कोई धनराशि प्राप्त नहीं हुई है. आप सभी हमारे शुभचिंतक लोग हैं, कृपया झूठी खबरें न फ़ैलाएँ. इससे हमारा नुक़सान तो होगा ही. सामाजिक मूल्यों का भी नुक़सान होगा.
यह सस्ती लोकप्रियता पाने का साधन मात्र है. pic.twitter.com/ziUaA8ct1W
— Somvir Rathee (@somvir_rathee) August 18, 2024
विनेशचे पती सोमवीर राठी यांनी एका वृत्तवाहिनीची बातमी शेअर करत म्हटले आहे की, “विनेश फोगट यांना खालील संबंधित संस्था, व्यापारी, कंपन्या आणि पक्षांकडून एकही पैसा मिळालेला नाही. तुम्ही सर्व आमचे हितचिंतक आहात, कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. यामुळे आपले नक्कीच नुकसान होणार आहे. सामाजिक मूल्यांचीही हानी होईल. स्वस्त लोकप्रियता मिळविण्याचे हे एक साधन आहे.”
Vinesh Phogat : विनेश फोगटने निवृत्तीबाबत घेतला यू-टर्न? म्हणाली ‘माझ्यात अजूनही…’
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटला रौप्यपदक निश्चित होते. मात्र सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी तिचे वजन जास्त असल्याचे आढळून आले. विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त होते. या कारणामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेशनेही रौप्यपदकासाठी क्रीडा लवादाच्या न्यायालयात दाद मागितली. मात्र तिथे तिचे अपील फेटाळण्यात आले. यामुळे विनेशसोबत तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. विनेश भारतात परतल्यानंतर तिचे जंगी असे स्वागत करण्यात आले.





