Paris Olympics 2024 : वाद विसरून ऑलिम्पिक गाजवण्यासाठी भारतीय कुस्तीपटू सज्ज..! जाणून घ्या, भारताची आतापर्यंतची ऑलिंपिकमधील कामगिरी…

Paris Olympics 2024 (Indian Wrestling Team) – भारतातील कुस्ती या क्रीडा प्रकाराला प्रचंड मोठा वारसा लाभलेला आहे. कराडच्या मराठमोळ्या खशाबा जाधव यांनी १९५२ मधील हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवून देत देशातील कुस्तीला जागतिक दर्जा प्रात्प करून दिला. कुस्ती हा भारताचा ऑलिम्पिकमधील सर्वात जुना खेळ आहे. 1920 च्या ऑलिम्पिकसाठी एक कुस्ती संघ देखील पाठवण्यात आला होता ज्यात दोन कुस्तीपटूंचा समावेश होता. आता हिच कुस्ती संपुर्ण देशात पसरली असून पूर्वी केवळ पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या खेळात आता मोठ्याप्रमाणात महिला देखील पुढे येत आहेत.
भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर आघाडीच्या महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांनंतर देशात प्रचंड गदारोळ माजला. त्यानंतर झालेल्या वादामुळे अर्थातच कुस्तीपटूंच्या तयारीवर त्याचा परिणाम झाला असला. तरी कुस्तीपटूंची तयारी चांगली असून यंदाही भारताला कुस्ती या क्रीडा प्रकारातून चांगल्या पदकांची अपेक्षा आहे. त्याचमुळे कुस्तीपटूंनी आता वाद विसरून पदकांवर लक्ष्य केंद्रीत करणे सर्व भारतीय क्रीडा चाहत्यांना अपेक्षित असेल.
महिला कुस्तीगीरांवर मोठी भिस्त
गेल्या वेळी रवी दहिया आणि बजरंग पुनिया यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले होते. हे दोन्ही कुस्तीपटू यावेळी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकले नाहीत ही निराशाजनक बाब आहे. पुरुष गटात फक्त अमन सेहरावतने (57 किलो) यंदा ऑलिम्पिकची पात्रता मिळवलेली आहे. यावेळी पदकाची जबाबदारी महिलांवर असून विनेश फोगट (५० किलो), अंतिम पंघाल (५३ किलो), अंशू मलिक (५७ किलो), निशा दहिया (६८ किलो) आणि रितिका हुडा (७६ किलो) वजनी गटात आव्हान देतील. कुस्तीत महिलांवरच भारताची भिस्त असणार आहे.
वादाचा तयारीला बसला फटका
हॉकीनंतर, कुस्ती हा भारताचा ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी खेळ आहे. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून या खेळात कुस्तीपटू देशासाठी सातत्याने पदके जिंकत आहेत. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये सात पदके जिंकली आहेत. काही वाद झाले असले तरी या खेळांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या कुस्तीकडून देशाला पुन्हा एकदा पदकाची आशा असेल. मात्र, डब्लूएफआय सोबतच्या वादामुळे कुस्तीपटूंच्या तयारीसाठी कायमस्वरूपी शिबिर घेण्यात आली नाहीत. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टाॅप्स) द्वारे केवळ कुस्तीपटूंची तयारी करून घेण्यात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) यासाठी 6.21 कोटी रुपये खर्च केले आहेत.
पॅरिससाठी भारतीय संघ (एकूण-०६)
पुरुष : १.अमन सेहरावत (57 किलो)
महिला :
१. विनेश फोगट (५० किलो)
२. अंतिम पंघाल (५३ किलो)
३.अंशू मलिक (५७ किलो)
४. निशा दहिया (६८ किलो)
५. रितिका हुडा (७६ किलो)
भारताची ऑलिंपिकमधील कामगिरी
जागतिक कुस्ती स्पर्धेत भारत…
लक्षवेधी :-
१. मराठमोळे खाशाबा जाधव हे स्वातंत्र्यत्तोर भारतातील कुस्तीतील पहिले पदकवीर आहेत. त्यांनी फ्रिस्टाईल बोंटामवेट ५७ किलो गटात कांस्य पदक जिंकूण भारतासाठी इतिहास रचला होता.
२. आत्तापर्यंत एकंदर ७ पदकांसह कुस्ती हा हाॅकीनंतर(१२ पदके) दुसरा सर्वात यशस्वी क्रीडाप्रकार आहे.
४. कुस्ती हा एकमेव असा क्रीडाप्रकार आहे ज्याच्यात भारताने गेल्या चार ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सातत्याने पदक जिंकली आहेत. (२००८,२०१२, २०१६, २०२०)







