Paris Olympics Closing Ceremony : पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप सोहळा रंगतदार शैलीत संपन्न, ऑलिम्पिक ध्वज लॉसएंजेलिसकडे सुपूर्त…

Paris Olympics 2024 Closing Ceremony : – पॅरिसमध्ये रंगलेला खेळांच्या महाकुंभाचा शानदार आणि रंगतदार समारोप सोहळा संपन्न झाला. तब्बल १० हजार ५०० खेळाडूंनी ३२ क्रीडा प्रकारात तब्बल ३२९ पदकांची लयलूट केली. पॅरिस येथे झालेल्या समारोपाचा सोहळा देश-विदेशातील १०० पेक्षा अधिक कलाकारांनी गाजविला. ज्याप्रकारे फ्रान्सच्या पॅरिसमध्ये शानदार उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याचप्रकारे महाकुंभाचा समारोप देखील देखील अनेकवर्ष स्मरणात राहील असाच झाला.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिका संघाने 40 सुवर्णपदकांसह पहिले स्थान राखले. चीननेही 40 सुवर्णपदके जिंकली पण त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कारण चीनपेक्षा अमेरिकेने जास्त रौप्यपदक पटकावले आहेत. अमेरिकेने 44 तर चीनने 27 रौप्यपदक जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी सहा पदकांसह 71 वे स्थान राखले.
ऑलिम्पिक हा खेळाचा उत्सव
३३ व्या पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन फ्रान्समधील पॅरिस शहरात करण्यात आले होते. या खेळाच्य महाकुंभामध्ये प्रत्येक खेळाडूने जिंकण्यासाठी मेहनत घेतली होती. त्याबरोबरीने या ऑलिम्पिकमध्ये अनेक विक्रम मोडून नव्याने प्रस्थापित करण्यात आले. त्यामुळे ऑलिम्पिक हाये खेळ आणि खेळाडूं यांच्यासाठी सर्वोत्तम उत्सव असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी म्हटले आहे.
भव्य असे स्टेड दि फ्रांस स्टेडियम
पॅरिस ऑलिम्पिकच्य भव्य समारोप समारंभाचे आयोजन स्टेड दि फ्रांस स्टेडियममध्ये करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी स्टेडियमचे रूपांतर थिएटरमध्ये करण्यात आले होते. या स्टेडियममध्ये जगभरातील सर्वच देशांचे खेळाडू आपापल्या देशाचे झेंडे घेऊन उपस्थित होते. यावेळी कलाकारांनी आपली कला सादर करताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यासाठी देशविदेशातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनू भाकर आणि श्रीजेश भारताचे ध्वजवाहक
समारोप सोहळ्याला पॅरिसमध्ये असलेल्या सर्व भारतीय खेळाडूंनी आपली उपस्थिती राखली. ३३ व्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकांची विजेती मानू भाकर आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलरक्षक पी आर श्रीजेश यांनी ध्वजवाहकाची भूमिका बजावली.
1️⃣1️⃣7️⃣ of our 🇮🇳 athletes, competed across 1️⃣6️⃣ sporting disciplines and gave us memories of a lifetime at #ParisOlympics2024🥳❤️
To our athletes, coaches, support staff, proponents of sport and especially the fans; THANK YOU 🫶🏻🙏🏼#TeamINDIA will be back #FasterHigherStronger💪🏻… pic.twitter.com/d276uPtHYw
— SAI Media (@Media_SAI) August 12, 2024
ऑलिम्पिक ध्वज लॉसएंजेलिसकडे सुपूर्त
चार वर्षांनंतर घेणात येणाऱ्या ३४ वे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये करण्यात येणार आहे. समारोप समारंभावेळी पुढील ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविणाऱ्या शहराकडे ऑलिम्पिक ध्वज हस्तांतर करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी ऑलिम्पिक ध्वज लॉस एंजेलिस शहराच्या महापौर केरन बास यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कुणी कमावली किती पदके ?
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चीनने आपला दबदबा कायम राखला. चीन संघाने ४० सुवर्ण, २७ रौप्य तर २४ कांस्य अशी तब्बल ९१ पदकांची कमाई केली. अमेरिका संघाने एकूण १२५ पदके जिंकली. मात्र चीन पेक्षा कमी सुवर्णपदके जिंकल्याने अमेरिकेला दुसरे स्थान मिळाले. अमेरिकेने ३९ सुवर्ण, ४४ रौप्य तर ४२ कांस्य पदके मिळविली. जापान संघाने २० सुवर्ण, १२ रौप्य आणि १३ कांस्य पदके मिळविताना तिसरे स्थान राखले. ऑस्ट्रेलियाने १८ सुवर्ण, १९ रौप्य व १६ कांस्यपदके मिळवून चौथे स्थान राखले. भारताच्या खेळाडूंनी सहा पदके जिंकताना ७१ स्थान राखले.





