Paris Olympics 2024 : मनु-सरबज्योतने नाकारली सरकारी नोकरीची ऑफर, कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही कराल कौतुक…

Manu Bhaker and Sarabjot Singh – पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीतून तीन पदके मिळाली. सरबज्योत सिंग आणि मनू भाकर यांनी 10 मीटर मिश्र पिस्तूल नेमबाजी प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. शनिवारीच मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सरबज्योत आणि मनू यांना क्रीडा खात्यात उपसंचालकपदाची नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.मात्र, हरियाणा येथील रहिवासी व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज सरबज्योत सिंग आणि मनू भाकर यांनी सरकारी नोकरी नाकारली आहे आणि त्याबरोबरच सरबज्योत आणि मनूने नोकरीची ऑफर न स्वीकारण्याचे कारणही दिले आहे.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे मीडिया समन्वयक मुकेश वशिष्ठ यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “या दोन खेळाडूंना नोकरीत सामील होणे कठीण आहे. हे दोघेही पदकासाठी खेळत आहेत.
मनू आणि सबरजोत सिंग यांचे म्हणणे आहे की, “दोघेही नोकरीसाठी नाही तर सुवर्णपदकासाठी खेळत आहेत. मनू आणि सबरजोत यांना क्रीडा विभागात उपसंचालकपदाची ऑफर देण्यात आली होती. या दोघांपूर्वी इतर खेळाडूंनाही नोकरीच्या ऑफर देण्यात आल्या आहेत.”
याबाबत सरबज्योत म्हणाला, “उपसंचालकाचे काम चांगले आहे, पण मी ते करणार नाही. मी शूटिंगवर लक्ष केंद्रित करेन. कुटुंबीयही चांगली नोकरी मागत आहेत, परंतू मला सध्या शूटिंगवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. नोकरी स्वीकारण्यात काहीही हरकत नाही परंतू, मी माझ्या नेमबाजीतील काही स्वप्नांच्या विरोधात जाऊ शकत नाही”, असेही त्याने पुढे म्हटले.
यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना पोलिसात नोकरी मिळायची. 9 ऑगस्ट रोजी नेमबाज सरबज्योत सिंग आणि मनू भाकर यांनी चंदीगडमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली होती. येथे मुख्यमंत्र्यांनी दोघांचाही गौरव केला. यानंतर या दोघांनाही क्रीडा विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती देण्याची घोषणा करण्यात आली होती.
Paris Olympics 2024 : विनेश फोगटपूर्वी CAS ने ‘या’ खेळाडूला दिला न्याय, पराभवानंतरही कांस्यपदक…
पुढच्यावेळी पदकाचा रंग बदलेल
पॅरिसहून परतल्यानंतर सरबज्योतने बोलताना, ‘मला यावेळी पदक मिळवून देण्यातील उणिवा दूर करून पुढच्या वेळी पदकाचा रंग बदलायला आवडेल. माझे पुढील लक्ष्य 2028 मध्ये लॉस एंजेलिस, यूएसए येथे होणारे ऑलिम्पिक आहे, ज्यामध्ये पदकाचा रंग देखील बदलण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
कोण आहे सरबज्योत?
सरबज्योत सिंगचा जन्म 30 सप्टेंबर 2001 रोजी झाला. तो हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील मुलाना अंतर्गत धेन गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील जतिंदर सिंग हे शेतकरी आहेत. आई हरदीप कौर गृहिणी आहेत. सरबजोत हा चंदीगड येथील सेक्टर 10 येथील डीएव्ही कॉलेजचा विद्यार्थी आहे. सरबज्योतने शाळेच्या काळातच शूटिंग सुरू केले. सेंट्रल फिनिक्स क्लबमध्ये तो एआर शूटिंग अकादमी, अंबाला कॅन्टचे प्रशिक्षक अभिषेक राणा यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले.





