Paris Olympics 2024 (Wrestling) : अंशू मलिकला पहिल्याच लढतीत पराभवाचा धक्का…

Paris Olympics 2024 (Wrestling,Women’s Freestyle 57 Kg) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत फक्त 3 पदके जिंकली आहेत आणि तिन्ही पदके नेमबाजीत जिंकली आहेत. याशिवाय अजून एकही पदक मिळालेले नाही. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी गुरुवारचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे.
आज टीम इंडियाला पॅरिस ऑलिम्पिकच्या 13व्या दिवशी आणखी पदके मिळू शकतात. हॉकीमध्ये टीम इंडिया (सांयकाळी 5.30) कांस्यपदकासाठी खेळणार आहे तर भालाफेकीत नीरज चोप्राचा अंतिम सामना (रात्री 11.55) असणार आहे.
दरम्यान, कुस्तीमधून भारतासाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात अंशू मलिकला राऊंड आॅफ 16 फेरीत अमेरिकेच्या हेलन लुईसकडून पराभव पत्करावा लागला आहे. अंशूचा हेलन हिने 2-7 असा पराभव केला. आता ती रेपेचेजसाठी पात्र ठरते की नाही हे पाहायचे आहे.
कांस्यपदक जिंकण्याची संधी पण….
पराभवानंतरही, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील अंशू मलिकची मोहीम अजून संपलेली नाही. जर अमेरिकेच्या हेलन लुईस हीने अंतिम फेरी गाठली तर तिला रेपचेज फेरीत भाग घेण्याची संधी मिळेल. या फेरीव्दारे तीला कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळेल, पण यासाठी हेलन लुईस हीने अंतिम फेरी गाठणे गरजेचे आहे.
Women’s Freestyle 57 Kg Round Of 16👇🏻
Anshu Malik loses to USA’s🇺🇸 Helen Maroulis 2-7 in her first bout at the #Paris2024Olympics.
Let the #Cheer4Bharat chants continue, let’s cheer for our wrestlers! 👍🏻#Paris2024Olympics pic.twitter.com/IT0GrVKC8R
— SAI Media (@Media_SAI) August 8, 2024
रेपचेज म्हणजे काय…?
रेपचेज हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ बचाव असा होतो. रेपचेज हा एक असा नियम आहे, जो उप-उपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीतील सामने हरल्यानंतरही कुस्तीपटूंना कांस्यपदक जिंकण्याची संधी उपलब्ध करून देतो. अंतिम फेरीत पोहोचलेल्या कुस्तीपटूंविरुद्ध पराभूत झालेले खेळाडू कांस्यपदक जिंकण्याचे दावेदार बनतात. कुस्तीमध्ये दोन कांस्यपदके दिली जातात. सुवर्ण आणि रौप्य पदकांची खात्री केवळ अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या कुस्तीपटूंनाच असते. उपांत्य फेरी गाठल्यानंतर कुस्तीतील कांस्यपदक निश्चित होत नाही .
उदा. समजा X कुस्तीपटूने उप-उपांत्यपूर्व फेरीत A ला, उपांत्यपूर्व फेरीत B ला आणि उपांत्यफेरीत C ला पराभूत केले. तर दुसरीकडे कुस्तीपटू Y ने वरीलप्रमाणे फेरीनुसार D,E आणि F यांना पराभूत केले .अशा परिस्थितीत X आणि Y हे कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहचतात. आणि पराभूत A,B,C,D,E,F हे सर्व कुस्तीपटू कांस्यपदकाचे दावेदार बनतात.
अशा परिस्थितीत प्रथम B चा सामना A शी आणि D चा सामना E शी होईल. यानंतर B आणि A यांच्यातील विजेत्याचा सामना C शी होईल. D आणि E यांच्यातील विजेत्याचा सामना F शी होईल. या दोन्ही साखळींमध्ये जे दोन खेळाडू शेवटी विजेते ठरतात त्यांना कांस्यपदके दिली जातात.





