Paris Olympics 2024 (Wrestling) : विनेश फोगटची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

Paris Olympics 2024 (Wrestling) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा आजचा 11 वा दिवस भारतासाठी खास आहे. भारताचा नीरज चोप्रा आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. तो भालाफेकमधील पात्रता फेरीत भाग घेणार आहे. याशिवाय भारतीय पुरुष हॉकी संघही उपांत्य फेरीच्या सामन्यात सहभागी होणार आहे. त्यांचा सामना तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन जर्मनीशी होणार आहे.
दरम्यान, कुस्तीमध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने टोकियो ऑलिम्पिक 2020 ची सुवर्णपदक विजेती आणि चार वेळा विश्वविजेती जपानच्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला आहे. यासह विनेशने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. विनेशचा हा पहिलाच सामना होता आणि तिने त्यात दमदार विजय नोंदवला.
50 kg Women’s Wrestling 1/8 Elimination Round Update:
VINESH PULLS OFF THE MOTHER OF ALL UPSETS! 🤯🤯
She hands defending Gold 🥇 medallist Yui Susaki of Japan her 4th loss of her career!
The 🇮🇳 wrestler Vinesh defeats Sasaki 3-2 to progress to the quarter-finals at the… pic.twitter.com/9PGmA0i7tb
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2024
विनेशचा हा पहिलाच सामना होता आणि तिने त्यात चमकदार कामगिरी केली. सामना जिंकल्यानंतर विनेश भावूक झाली. कुस्तीमध्ये विनेश महिलांच्या 50 किलो वजनी गटात 0-2 अशी पिछाडीवर होती.
यानंतर शेवटच्या 15 सेकंदात विनेशने जपानच्या कुस्तीपटूला चितपट केले आणि तीन गुण मिळवले. आता भारतीय वेळेनुसार विनेश फोगटचा उपांत्यपूर्व सामना दुपारी 4 वाजता सुरू होईल.





