Paris Olympics 2024 (Wrestling) : उपांत्यपूर्व फेरीत रितिका हुड्डाला पराभवाचा धक्का, पण नशिबाने साथ दिली तर…

Paris Olympics 2024 (Women’s Freestyle 76 kg, Reetika Hooda) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 आता शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज (10 ऑगस्ट, शनिवार) भारताचा 15 वा दिवस असेल. आतापर्यंत पूर्ण झालेल्या 14 दिवसांत भारताच्या खात्यात एकूण 6 पदके जमा झाली आहेत. यामध्ये नेमबाजीत 3, कुस्ती, हाॅकी आणि भालाफेक या क्रीडा प्रकारात प्रत्येकी 1 अशी 6 पदके जिंकली असून पदकतालिकेत भारत 69 व्या स्थानी आहे.
दरम्यान, कुस्तीतून निराशाजनक बातमी समोर आली आहे. महिलांच्या 76 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत भारतीय कुस्तीपटू रितिका हुड्डा हिला पराभवाचा धक्का बसला आहे. रितिकाला उपांत्यपूर्व फेरीत किर्गिस्तानच्या अव्वल मानांकित एइपेरी मेडेट किझीने पराभूत केले आहे.
सामन्यात रितिकाने पॅसिव्हिटी वेळेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीनंतरचा हा गुण होता. मात्र, दुसऱ्या फेरीत किर्गिस्तानी खेळाडूलाही पॅसिव्हिटी वेळेत एक पॉइंट मिळाला आणि स्कोअर 1-1 असा बरोबरीत राहिला. दुसऱ्या फेरीच्या शेवटी एकही कुस्तीपटू गुण मिळवू शकला नाही, त्यामुळे बरोबरी असताना किर्गिस्तानच्या कुस्तीपटूला विजेता घोषित करण्यात आले. कारण कुस्तीचा सामना टाय (बरोबरी) झाल्यास, नंतर गुण मिळवणारा कुस्तीपटू विजेता ठरतो.
Women’s Freestyle 76 kg Quarter-finals👇🏻
India’s 🇮🇳 star wrestler 🤼♀ Reetika Hooda put up a valiant effort before losing to World No. 1 Aiperi Medet Kyzy of Kyrgyzstan 🇰🇬 by points(1-1).
Well tried Reetika! Let’s cheer for her brave performance and #Cheer4Bharat🇮🇳… pic.twitter.com/GfNaZMXjSW
— SAI Media (@Media_SAI) August 10, 2024
कुस्तीमध्ये पॅसिव्हिटीचा नियम काय आहे?
रितिकाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अतिशय चुरशीचा होता आणि दोन्ही कुस्तीपटूंनी 1-1 गुण मिळवले. फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये, सामना आक्रमक करण्यासाठी पॅसिव्हिटीचा वापर केला जातो. असे तेव्हा घडते जेव्हा पहिल्या दोन मिनिटांत कोणत्याही कुस्तीपटूने एकही गुण मिळवलेला नसतो. अशा वेळी कमी आक्रमक असलेल्या कुस्तीपटूला 30 सेकंदांत एक गुण मिळवावा लागतो. जर त्या कुस्तीपटूने तीस सेकंदात एकही गुण मिळवला नाही तर विरोधी संघाला एक गुण मिळतो.
रितिका हुडाने पहिल्या हाफमध्ये पॅसिव्हिटीद्वारे 1 गुण घेतला. त्यानंतर उत्तरार्धात किर्गिस्तानच्या कुस्तीपटूने पॅसिव्हिटीद्वारे 1 गुण घेतला. कुस्तीच्या नियमांनुसार, शेवटचे तांत्रिक गुण मिळवणारा कुस्तीपटू जिंकतो. शेवटचा गुण किर्गिस्तानच्या कुस्तीपटूने घेतल्याने ती विजेती ठरली.
रिपेचेज फेरीद्वारे कांस्यपदक जिंकण्याची संधी….
रितिकाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावे लागले असले तरी नशिबाने साथ दिली तर तिला सामन्यात पुढे जाण्याची आणखी एक संधी असेल. रितिकाला आता रिपेचेज फेरीद्वारे कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. पण त्यासाठी रितिकाला पराभूत करणारी किर्गिस्तानची अव्वल मानांकित कुस्तीपटू एइपेरी मेडेट किझीने स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे गरजेचे आहे. किर्गिस्तानच्या कुस्तीपटूची सेमीफायनल लढत ही आज रात्री 10.30 वाजता आहे. ती फायनलमध्ये गेल्यास रितिकाला रिपेचेज फेरीत संधी मिळेल. रिपेचेज फेरी या रविवारी (11 आॅगस्ट) दुपारी 3.10 वाजल्यापासून सुरू होतील.
Paris Olympics 2024 : भारताचा पदकांचा षटकार..! कुस्तीपटू अमन सेहरावतला 57 किलो वजनी गटात कांस्य…
रितिका आहे भारतीय नौदलाची अधिकारी…
रोहतकमध्ये जन्मलेली रितिका ही भारतीय नौदलाची अधिकारी आहे. ती मुख्य क्षुद्र अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. रितिकाची कारकीर्द फार मोठी नाही, ही खेळाडू 2022 मध्ये झालेल्या जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये 72 किलो गटात कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरली होती. यानंतर या खेळाडूने 2023 मध्ये तिराना येथे झालेल्या 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. 2024 मध्येच रितिकाने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 72 किलो गटात कांस्यपदक जिंकले होते.





