Paris Olympics 2024 (Wrestling) : विनेश फोगटची उपांत्य फेरीत धडक, पदकापासून फक्त एक विजय दूर…

Paris Olympics 2024 (Wrestling,Women’s Freestyle 50 kg Quarter-Finals) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी आज (06 ऑगस्ट) 11 वा दिवस आहे. कुस्ती स्पर्धेच्या राऊंड ऑफ 16 फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या कुस्तीपटूचा पराभव करणाऱ्या भारताच्या विनेश फोगटने त्यानंतरचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे.
विनेशने आता महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता ती पदकापासून फक्त एक विजय दूर आहे. विनेशने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या उक्सानाचा 7-5 असा पराभव केला. विनेशचा उपांत्य सामना आज रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 10.15 वाजता खेळवला जाईल. उपांत्य फेरीत विनेशचा सामना क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझशी होईल.
Women’s Freestyle 50 kg Quarter-Finals👇🏻
After upsetting #Tokyo2020 gold medallist🥇 Susaki, @Phogat_Vinesh 🇮🇳 next outclasses Ukraine’s🇺🇦 Oksana Livach 7-5 in the quarter-finals to advance to the semis of the #Paris2024Olympics.
With this win, Vinesh is now just one win away… pic.twitter.com/8iO5BeH2Hu
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2024
तत्पूर्वी , राऊंड ऑफ 16 फेरीत म्हणजेच पहिल्या सामन्यात भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने टोकियो ऑलिम्पिक 2020 ची सुवर्णपदक विजेती आणि चार वेळा विश्वविजेती जपानच्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता . विनेशचा हा पहिलाच सामना होता आणि तिने त्यात दमदार विजयाची नोंद केली.
विनेशचा हा विजय खूप मोठा आहे कारण तिने ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जपानच्या नंबर 1 महिला कुस्तीपटूला पराभूत केले . एवढेच नाही तर युई सुसाकीने आजपर्यंत तिच्या कारकिर्दीत एकही आंतरराष्ट्रीय सामना गमावलेला नव्हता.





