Paris Olympics 2024 (Women’s 100m Hurdles) : अँथलीट ज्योती याराजी रिपेचेज फेरीतही ठरली अपयशी…

Paris Olympics 2024 (Women’s 100m Hurdles Repechage Round) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत फक्त 3 पदके जिंकली आहेत आणि तिन्ही पदके नेमबाजीत जिंकली आहेत. याशिवाय अजून एकही पदक मिळालेले नाही. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी गुरुवारचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. आज टीम इंडियाला पॅरिस ऑलिम्पिकच्या 13व्या दिवशी आणखी पदके मिळू शकतात. हॉकीमध्ये टीम इंडिया (सांयकाळी 5.30) कांस्यपदकासाठी खेळणार आहे तर भालाफेकीत नीरज चोप्राचा अंतिम सामना (रात्री 11.55) असणार आहे. तर त्याआधी आज रात्री 9.45 वाजता उपांत्य फेरीत अमन सेहरावतचा सामना जपानच्या ‘रे हिगुची’शी होणार आहे.
दरम्यान, ॲथलेटिक्समधून भारतासाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. महिलाच्या 100 मीटर अडथळा शर्यतीच्या रिपेचेज फेरीतही धावपटू ज्योती याराजीच्या हाती निराशा आली आहे.
Women’s 100m Hurdles Repêchage Round👇🏻#Paris2024Olympics debutant @JyothiYarraji finishes her #Olympic campaign, clocking 13.17 seconds and finishing 4th in Heat 1 of the Repechage rounds.
First 2 in each Heat qualified to Semi-final.
Let’s cheer for the rest of the… pic.twitter.com/A7JdbwHpCT
— SAI Media (@Media_SAI) August 8, 2024
ज्योती याराजीने 100 मीटर अडथळा शर्यतीच्या रिपेचेज फेरीत 13.17 सेकंद वेळेसह चौथे स्थान पटकावले. त्यामुळे ती उपांत्य फेरी गाठण्यास अपात्र ठरली. दरम्यान, रिपेचेज फेरीतील प्रत्येक हीटमधील अव्वल दोन खेळाडू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतात.
Paris Olympics 2024 (Wrestling) : अमन सेहरावतची सेमीफायनलमध्ये धडक, पदकापासून फक्त एक विजय दूर…
दरम्यान, पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये बुधवारी भारतीय अँथलीट ज्योती याराजीने महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीच्या चौथ्या फेरीत 13.16 सेकंदांची वेळ नोंदवत सातवे स्थान पटकावले होते. त्यामुळे तिला उपांत्य फेरीसाठी थेट पात्र होता आले नव्हते, पण ती रिपेचेज फेरीसाठी पात्र ठरली होती.





