Paris Olympics 2024 (Wrestling) : अमन सेहरावतची सेमीफायनलमध्ये धडक, पदकापासून फक्त एक विजय दूर…

Paris Olympics 2024 (Aman Sehrawat ,Wrestling,Men’s Freestyle 57 Kg ) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत फक्त 3 पदके जिंकली आहेत आणि तिन्ही पदके नेमबाजीत जिंकली आहेत. याशिवाय अजून एकही पदक मिळालेले नाही. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी गुरुवारचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. आज टीम इंडियाला पॅरिस ऑलिम्पिकच्या 13व्या दिवशी आणखी पदके मिळू शकतात. हॉकीमध्ये टीम इंडिया (सांयकाळी 5.30) कांस्यपदकासाठी खेळणार आहे तर भालाफेकीत नीरज चोप्राचा अंतिम सामना (रात्री 11.55) असणार आहे.
दरम्यान, कुस्तीमधून भारतासाठी आंनददायक बातमी समोर येत आहे. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरवतने दमदार कामगिरी करताना सलग दोन विजय नोंदवत सेमीफायनलमध्ये (उपांत्य फेरी) धडक मारली आहे. हा सामना आज रात्री 9.45 वाजता खेळवला जाईल. आता पदकापासून तो फक्त एक विजय दूर आहे.
2 Back to back technical superiority wins for Aman bhai!
Men’s Freestyle 57 Kg Quarterfinals👇🏻
Aman Sehrawat defeats 2022 World Champion Albania’s Zelimkhan Abakarov 12-0 in his quarterfinal bout at the #Paris2024Olympics. His semis bout later tonight at 9:45 pm.
Let the… pic.twitter.com/2MJnOCTx1i
— SAI Media (@Media_SAI) August 8, 2024
उपांत्य फेरीत अमन सेहरावतचा सामना जपानच्या ‘रे हिगुची’शी होणार आहे. हिगुचीने रिओ 2016 मध्ये रौप्यपदक जिंकले आहे. अमन सेहरवतने पुरुषांच्या 57 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत अल्बेनियाच्या अबाकारोव्ह झेलीमखानचा पराभव केला. अमनने हा सामना 12-0 ने जिंकला.
Men’s Freestyle 57 Kg Round of 16👇🏻
Aman Sehrawat defeats North Macedonia’s Vladimir Egorov 10-0 by technical superiority at the #Paris2024Olympics. Don’t forget to tune in as Aman plays his QF later today from 4pm onwards.
Well done, Aman👏🏻
Keep chanting #Cheer4Bharat, let’s… pic.twitter.com/UNwiY83Bqy
— SAI Media (@Media_SAI) August 8, 2024
तत्पूर्वी, अमन सेहरावत याने 57 किलो वजनी गटाच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रतिस्पर्धी मॅसेडोनियाचा कुस्तीपटू व्लादिमीर एगोरोव्हला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. या लढतीत अमन सेहरावतने तांत्रिक श्रेष्ठतेवर व्लादिमीर एगोरोव्हचा 10-0 असा पराभव केला होता.
महिला कुस्तीपटू अंशूला पराभवाचा धक्का…
दुसरीकडे महिलांच्या 57 किलो वजनी गटात भारतीय कुस्तीपटू अंशू मलिकला पहिल्याच लढतीत म्हणजे राऊंड आॅफ 16 च्या फेरीत अमेरिकेच्या हेलन लुईसकडून पराभव पत्करावा लागला. अंशूचा हेलन हिने 2-7 असा पराभव केला. आता अंशू रेपेचेजसाठी पात्र ठरते की नाही हे पाहायचे आहे.
Paris Olympics 2024 (Weightlifting) : मीराबाई चानूचे पदक थोडक्यात हुकले…
पराभवानंतरही, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील अंशू मलिकची मोहीम अजून संपलेली नाही. जर अमेरिकेच्या हेलन लुईस हीने अंतिम फेरी गाठली तर तिला रेपचेज फेरीत भाग घेण्याची संधी मिळेल. या फेरीव्दारे तीला कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळेल, पण यासाठी हेलन लुईस हीने अंतिम फेरी गाठणे गरजेचे आहे.





