Ilse Aigner : जर्मनीला पहिल्यांदाच मिळणार महिला अध्यक्षा; मर्झ यांच्या पक्षाकडून इल्से आयग्नर यांचे नामांकन
जर्मनीमध्ये चान्सेलर फेड्रीक मर्झ यांच्या पक्षाने भावी अध्यक्षा म्हणून मध्यम-उजव्या विचारांच्या इल्से आयग्नर (Ilse Aigner) यांच्या नावाचे नामांकन केले आहे.

Ilse Aigner : जर्मनीमध्ये चान्सेलर फेड्रीक मर्झ यांच्या पक्षाने भावी अध्यक्षा म्हणून मध्यम-उजव्या विचारांच्या इल्से आयग्नर (Ilse Aigner) यांच्या नावाचे नामांकन केले आहे. देशाचे नेतृत्व करण्यासाठी देशातील उदारमतवादी पक्षांनी आपल्याला पाठिंबा दियावा, असे आवाहन आयग्नर यांनी केले आहे. देशात राजकीय ध्रुवीकरण तीव्र झाले असताना समर्थ केंद्रीय सरारसाठी आपण प्रयत्नशील असू, असे आयग्नर यांनी सोमवारी बोलताना सांगितले.
आपल्याला व्यापक राजकीय पाठिंबा मिळत असून लोकप्रिय आणि कट्टरवाद्यांना हा एक समर्थ संकेत दिला गेल्याचेही त्यांनी सांगितले. आयग्नर या बावारिया प्रांताच्या विधानसभेच्या सभापती असून त्या देशाच्या राष्ट्रीय सरकारमधील आणि ख्रिश्चन सोशल युनियन या मर्झ यांच्या पुराणमतवादी गटामधील सर्वात लहान तीनपैकी एका पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्या पक्षाने अध्यक्षपदासाठी आयग्नर यांच्या नावाचा दीर्घकाळापासून आग्रह धरला होता.
मर्झ यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन आणि मध्यममार्गी-डाव्या सोशल डेमोक्रॅट्सच्या नेत्यांनी सोमवारी आयग्नर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते आहे.अध्यक्षांची निवड होणाऱ्या राष्ट्रीय संसदेमध्ये सत्तारुढ पक्षांचे बहुमत आहे. आयग्नर यांना विरोधी ग्रीन पक्षाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
आयग्नर (Ilse Aigner) या किशोरवयात असल्यापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्या १९९४ साली पहिल्यांदा बावरियान प्रांताच्या विधीमंडळात निवडून गेल्या होत्या. त्यांनी २००८ पासून २०१३ दरम्यान चान्सेलर अँजेला मर्केल या चान्सेलर असताना जर्मनीच्या कृषी मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर त्या बावारियाच्या अर्थमंत्री, पर्यटन मंत्री आणि शेवटी ८ वर्षांपुर्वी विधीमंडळाच्या सभापती झाल्या.






