Paris Olympics 2024 (Wrestling) : भारतीय कुस्तीपटू रितिका हुड्डाची उपांत्यपूर्व फेरीत धडक….

Paris Olympics 2024 (Women’s Freestyle 76 kg) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 आता शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज (10 ऑगस्ट, शनिवार) भारताचा 15 वा दिवस असेल. आतापर्यंत पूर्ण झालेल्या 14 दिवसांत भारताच्या खात्यात एकूण 6 पदके जमा झाली आहेत. यामध्ये नेमबाजीत 3, कुस्ती, हाॅकी आणि भालाफेक या क्रीडा प्रकारात प्रत्येकी 1 अशी 6 पदके जिंकली असून पदकतालिकेत भारत 69 व्या स्थानी आहे.
दरम्यान, कुस्तीतून पुन्हा एकदा आंनददायक बातमी समोर आली आहे. महिलांच्या 76 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरीत भारतीय कुस्तीपटू रितिका हुड्डा हिने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारी रितिका ही पहिली महिला कुस्तीपटू आहे.
Women’s Freestyle 76 kg Round of 16👇🏻
India’s star wrestler 🤼♀ Reetika Hooda puts up an impressive performance on her Olympic debut as she beats Hungary’s🇭🇺 Nagy Bernadett 12-2 by technical superiority to advance to the quarterfinals. 💪
She will next face World number 1… pic.twitter.com/7tPhuBgl7u
— SAI Media (@Media_SAI) August 10, 2024
रितिकाने उप-उपांत्यपूर्व फेरीत हंगेरीच्या बर्नाडेट नेगीचा तांत्रिक श्रेष्ठतेने 12-2 असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत रितिकाला जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची कुस्तीपटू एइपेरी मेडेट काइज़ीचा सामना करावा लागणार आहे. हा सामना दुपारी 4 वाजल्यापासून होणार आहे. साहजिकच ही स्पर्धा तिच्यासाठी सोपी असणार नाही. किर्गिस्तानच्या या महिला कुस्तीपटूने दोनदा आशियाई चॅम्पियनशिप जिंकली आहे. ही खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता देखील आहे.
Paris Olympics 2024 : भारताचा पदकांचा षटकार..! कुस्तीपटू अमन सेहरावतला 57 किलो वजनी गटात कांस्य…
रितिका आहे भारतीय नौदलाची अधिकारी…
रोहतकमध्ये जन्मलेली रितिका ही भारतीय नौदलाची अधिकारी आहे. ती मुख्य क्षुद्र अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. रितिकाची कारकीर्द फार मोठी नाही, ही खेळाडू 2022 मध्ये झालेल्या जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये 72 किलो गटात कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरली होती. यानंतर या खेळाडूने 2023 मध्ये तिराना येथे झालेल्या 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. 2024 मध्येच रितिकाने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 72 किलो गटात कांस्यपदक जिंकले होते.





