Paris Olympics 2024 (Men’s Archery Recurve Team) : तिरंदाजीत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात….

Paris Olympics 2024 (Men’s Archery Recurve Team) : तिरंदाजीच्या पुरुष दुहेरीत भारताच्या पदकाच्या आशा संपल्या आहेत. उपांंत्यपूर्व फेरीत तुर्कीने तृतीय मानांकित भारतीय पुरुष तिरंदाजी संघाचा पराभव करून प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तुर्कीने ही लढत 6-2 अशी जिंकल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
🇮🇳 Result Update: India Men’s Archery Recurve Team Quarter-finals
The trio of Dhiraj Bommadevara, Tarundeep Rai and Pravin Ramesh Jadhav lose in the quarterfinals stage of the 🇫🇷#ParisOlympics2024. pic.twitter.com/WWOP3HryRR
— SAI Media (@Media_SAI) July 29, 2024
भारतीय खेळाडूंनी चांगली लढत देऊनही विजय साकारण्यास अपयश आले. तुर्कीने 3 सेट जिंकले, तर भारत त्याच्याविरुद्ध फक्त एक सेट जिंकू शकला. तुर्कीने पहिले दोन सेट जिंकले होते, मात्र भारतीय तिरंदाजी संघाने दमदार पुनरागमन करत तिसरा सेट जिंकला. मात्र, धीरज, प्रवीण आणि तरुणदीप या त्रिकुटाला चौथ्या सेटमध्ये गती राखता आली नाही आणि हा सेट गमवावा लागला. तुर्कीने भारताविरुद्धचा पहिला सेट 57-53 , दुसरा सेट 55-52 तर चौथा सेट 58-54 असा जिंकला. तर भारताला एकमेव म्हणजे तिसऱ्या सेटमध्ये 55-54 असा विजय मिळवता आला.
महिला तिरंदाजी संघही पराभूत…
भारतीय महिला तिरंदाजी संघाचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध 6-0 असा पराभव झाला. अंकिता भकत, भजन कौर आणि दीपिका कुमारी या त्रिकुटाचा नेदरलँड्सच्या क्विंटी रोफेन, गॅबी श्लोएसर आणि विंकेल व्हॅन डर या त्रिकुटाने 6-0 असा पराभव केला. पहिल्या फेरीत नेदरलँड्सने 52 गुण मिळवले, तर भारतला 51 गुण करता आले. दुसऱ्या फेरीत नेदरलँडने 54, तर भारताने 49 गुण घेतले. अखेरच्या तिसऱ्या फेरीत भारताने 48 गुण तर नेदरलँडच्या त्रिकुटाने 53 गुण घेतले.





