Senior National Archery C’ship 2024 : रिकर्व्ह प्रकारात धीरज अन् दीपिकाचा सुवर्णवेध….

Senior National Archery Championship 2024 (Jamshedpur) : – धीरज बोम्मादेवरा आणि दीपिका कुमारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान मोडून काढताना शुक्रवारी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला रिकर्व्ह गटाचे विजेतेपद पटकावले.
पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचे (PSPB) प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपिकाने महिलांच्या अंतिम फेरीत तिची पॅरिस ऑलिम्पिकची सहकारी अंकिता भकटचे आव्हान 6-2 असे मोडून काढताना स्पर्धेतील विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दीपिकाने पीएसपीबी संघासाठी दोन सुवर्णपदके मिळविली आहेत. तिने अतनू दाससह मिश्र सांघिकमध्ये पंजाब संघाला ६-२ असे पराभूत करताना विजेतेपद मिळविले.
सेनादलाच्या धीरज बोम्मादेवराला हरियाणाचा नवोदित तिरंदाज दिव्यांश चौधरीने तगडे आव्हान दिले होते. मात्र धीरजने दमदार कामगिरी करताना अचूकता आणि संयमाच्या जोरावर दिव्यांश चौधरीचे आव्हान ६-२ असे मोडून काढताना विजेतेपदाला गवसणी घातली.
Asian Youth Weightlifting C’ship 2024 : भारताच्या ज्योश्ना साबरची सुवर्णपदकाला गवसणी…
धीराजला सांघिकमध्ये मात्र कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सेनादलाला राजस्थान संघाने ५-४ असे पराभूत करताना अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत रेल्वे संघाने राजस्थानला ६-२ असे नामविताना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.





