Paris Olympics 2024 (Badminton ,Men’s Doubles) : सामना ‘न’ खेळताच चिराग-सात्विक जोडीने गाठली उपांत्यपूर्व फेरी …

Paris Olympics 2024 (Badminton ,Men’s Doubles) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा दुसरा सामना रद्द झाला आहे. मार्विन सीडेल आणि मार्क लॅम्सफूस या जर्मन जोडीने दुखापतीमुळे सामन्यापूर्वीच माघार घेतली. त्यामुळे भारतीय जोडीला आता मोठा फायदा झाला आहे.
वास्तविक, पहिल्या सामन्यात सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने यजमान फ्रेंच जोडी कोर्वी लुकास आणि लेबर रोनन यांच्यावर 21-17, 21-14 असा विजय मिळवला होता. त्याचवेळी, दुसरीकडे फ्रान्सच्या या जोडीला दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे अशा स्थितीत सात्विक आणि चिराग जोडी ग्रुपमध्ये टॉप 2 मध्ये राहिल हे निश्चित आहे.
सात्विक आणि चिराग ही जोडी ग्रुप स्टेजचा शेवट टॉप-2 ने करतील. अशा परिस्थितीत या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. यासह सात्विक आणि चिराग ही ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली भारतीय दुहेरी जोडी ठरली आहे. बॅडमिंटनमध्ये भारतासाठी ही मोठी उपलब्धी आहे.
#Badminton Good news on Day 3
Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty qualify for Men’s Doubles – Quarter Finals
They become the 1st ever Indian Men’s Doubles pair to qualify!⚡️#Paris2024 #Olympics pic.twitter.com/0uLdkIzuaR
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 29, 2024
आता, सात्विक आणि चिराग जोडीचा पुढील सामना 30 जुलैला इंडोनेशियाच्या अल्फियान फजर आणि अर्दियांतो मुहम्मद रियान या जोडीविरूध्द होईल. जर या सामन्यात त्यांनी इंडोनेशियाच्या जोडीला पराभूत केले तर भारतीय जोडी गटात अव्वल स्थानावर राहिल.
Paris Olympics 2024 (Badminton) : पोनप्पा-क्रॅस्टो जोडीचा सलग दुसरा पराभव, पुढील वाटचाल झाली खडतर….
भारतीय जोडीचा पुढील हा सामना 30 जुलै रोजी सायंकाळी 05.30 वाजता होणार आहे. त्यांच्या नजरा विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठण्यावर असतील. भारताची ही जोडी पदकाची सर्वात मोठी दावेदारही आहे. अशा स्थितीत भारताला या जोडीकडून खूप अपेक्षा आहेत.





