Paris Olympics 2024 & Hockey Team india : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलैपासून सुरू होत आहेत. या खेळांमध्ये भारतीय हॉकी संघ सहभागी होणार आहे. हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकली आहेत. भारताला पहिले सुवर्णपदक हे हॉकीमध्येच मिळाले होते. आता पुन्हा एकदा भारतीय पुरुष हॉकी संघ पॅरिसमध्ये आपले वर्चस्व, प्रभाव दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. हॉकीबद्दल बोलायचे झाले तर या खेळात भारताचा झेंडा सुरुवातीपासून फडकत आला आहे. 2024 मध्ये, हरमनप्रीत सिंग हॉकी संघाचा प्रभारी आहे आणि संपूर्ण संघ खूप मजबूत दिसत आहे. ऑलिम्पिकमधील भारतीय हॉकीचा इतिहास… भारतीय हॉकी संघटनेची स्थापना भारतात 1925 साली झाली. यानंतर भारतीय हॉकी संघाने 1928 मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. भारताने पहिल्याच प्रयत्नात सुवर्ण लक्ष्य केले. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने हॉकीमध्ये एकूण 8 सुवर्णपदके जिंकली आहेत. भारताने 1928 ते 1956 पर्यंत सलग 6 सुवर्णपदके जिंकली. यानंतर 1964 आणि 1980 मध्ये भारताने पुन्हा सुवर्णपदक जिंकले. याशिवाय भारतीय संघाने 1960 मध्ये रौप्य, 1968, 1972 आणि 2020 ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिम्पिक इतिहासात, भारताने हॉकीमध्ये एकूण 12 पदके जिंकली आहेत, ज्यात 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान, 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारताला अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 41 वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक… भारतासाठी 1980 नंतर हाॅकीध्ये पदकांचा मोठा दुष्काळ पडला होता, परंतु मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने 5 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो येथे कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 ने पराभव केला आणि तब्बल 41 वर्षानंतर या खेळात देशासाठी पुन्हा एकदा पदक जिंकले. Paris Olympics 2024 : भारताने 1900 साली पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये घेतला होता सहभाग..! जाणून घ्या, कशी राहिली आहे आतापर्यंतची कामगिरी… पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक 27 जुलै – भारत विरूध्द न्यूझीलंड – रात्री 9 वाजता 29 जुलै – भारत विरूध्द अर्जेंटीना – सांयकाळी 4:15 वाजता 30 जुलै – भारत विरूध्द आयर्लंड – रात्री 4:45 वाजता 1 ऑगस्ट – भारत विरूध्द बेल्जियम – दुपारी 1:30 वाजता 2 ऑगस्ट – भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया – सांयकाळी 4:45 वाजता पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचा हॉकी संघ – गोलकीपर : पीआर श्रीजेश डिफेंडर : जरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह, सुमित, संजय मिडफील्डर : राजकुमार पाल, शमशेर सिंह, मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद फॉरवर्ड : अभिषेक, सुखजीत सिंह, ललित कुमार उपाध्याय, मंदीप सिंह, गुरजंत सिंह राखील खेळाडू : नीलकांत शर्मा, जुगराज सिंह, कृष्ण बहादुर पाठक Paris Olympics 2024 : यंदा ‘हे’ 21 नेमबाज साधणार पदकांवर निशाणा.! त्याआधी जाणून घ्या, ऑलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांची कामगिरी… या भारतीय खेळाडूंकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा 1. हरमनप्रीत सिंग : भारतीय हॉकी संघाचा ड्रॅग-फ्लिक सुपरस्टार आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगकडून ऑलिम्पिकमध्ये संघाला विजयापर्यंत नेण्याची अपेक्षा आहे. 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकचाही तो भाग होता. आता त्याच्याकडून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्येही पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. 2. पीआर श्रीजेश : भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश चौथे ऑलिम्पिक खेळणार आहे. त्याने लंडन 2012 मध्ये पहिले ऑलिंपिक खेळले. आता पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये संघाच्या विजयाची जबाबदारी त्याच्यावर असेल. तो संघासाठी जितके अधिक गोल वाचवेल, तितका भारताला फायदा होईल. या स्पर्धेतील त्याची उत्कृष्ट कामगिरी संघासाठी पदकाची हमी देऊ शकते. 3. मनदीप सिंग : मनदीप सिंग भारतासाठी दुसरे ऑलिम्पिक खेळणार आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भाग घेतला आणि संघासाठी चमकदार कामगिरी केली. आता त्याच्याकडून अपेक्षा असेल की तो पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चांगली कामगिरी करून संघाला पदक मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान देईल. 4. मनप्रीत सिंग : भारतीय पुरुष हॉकी संघाचा मिडफिल्डर मनप्रीत सिंगकडून पॅरिस 2024 ऑलिम्पिक संघासाठी चांगली कामगिरी अपेक्षित आहे. मनप्रीत हा संघाचा अनुभवी खेळाडू असून तो चौथे ऑलिम्पिक खेळत आहे. 2012 लंडन ऑलिम्पिक, 2016 रिओ ऑलिम्पिक आणि 2020 टोकियो ऑलिंपिकमध्ये त्याने संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे.