Paris Olympics 2024 (Hockey) : उपांत्य फेरीत भारत पराभूत, आता कांस्यपदकासाठी लढणार…

Paris Olympics 2024 (Hockey SemiFinal 2) : पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला जर्मनीविरुद्ध 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला. यासह टीम इंडियाचे 44 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
वास्तविक, शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांमधील सामना 2-2 गोलने बरोबरीत होता, मात्र खेळ संपण्याच्या 06 मिनिटांपूर्वीच जर्मनीने एक गोल केला आणि 3-2 ने सामना जिंकून पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय संघ शेवटच्या क्वार्टरमध्ये गोलकीपरला सब्स्टिट्यूट करत 12 खेळाडूंसह खेळला, पण जर्मनीशी बरोबरी साधता आला नाही आणि सामना गमवावा लागला. टीम इंडियाला आता कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. यासाठीचा सामना 8 ऑगस्टला होणार आहे. आता अंतिम फेरीत जर्मनीचा सामना नेदरलँडशी होईल, तर भारतीय संघ कांस्यपदकासाठी स्पेनशी भिडणार आहे.





