Bilateral Hockey Series 2024 : मालिकेतील अखेरची लढत जिंकूनही टीम इंडियाला मिळाली नाही ट्रॉफी, जाणून घ्या कारण….

India vs Germany Hockey Match :- भारत व जर्मनी दरम्यानच्या लढतीमध्ये भारताने दुसरी लढत 5-3 अशी जिंकली. मात्र, दोन सामान्यांच्या मालिकेत दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाल्याने, मालिका विजयाचा निर्णय शूटआउटमध्ये घेण्यात आला. या शूटआऊटमध्ये जर्मनीने भारताला 3-1 असे पराभूत करताना मालिका विजय साकारला.
Germany wins the penalty shootout 3-1 and win the series!#PFCINDvGER #IndiaKaGame #HockeyIndia
— Hockey India (@TheHockeyIndia) October 24, 2024
मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या दुसऱ्या लढतीमध्ये जर्मनीच्या एलियान मजकूरने 7 व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मध्यंतराला जर्मनी 1-0 असा आघाडीवर होता. मध्यंतरानंतर भारताच्या सुखजीत सिंगने 34 व्या मिनिटाला गोल करताना बरोबरी साधून दिली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने 42 व्या व 43 व्या मिनिटाला सलग दोन गोल करताना भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.
FULL TIME!
India completes a stunning second-half turnaround, dominating Germany with a 5-2 win after trailing at halftime. Goals from Sukhjeet, Harmanpreet, and Abhishek seal the deal! 🏑🔥#PFCINDvGER #IndiaKaGame #HockeyIndia
.
.
.@CMO_Odisha@IndiaSports@Media_SAI… pic.twitter.com/0nykWkoQEs— Hockey India (@TheHockeyIndia) October 24, 2024
त्यानंतर अभिषेकने 45 व्या तर पुन्हा सुखजीत सिंगने 48 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी 5-1 अशी केली. जर्मनीच्या एलियान मजकूरने 57 व्या मिनिटाला दुसरा तर हेन्रिक मेर्टगेन्सने शेवटच्या मिनिटाला गोल केले. मात्र, भारताने लढत 5-3 अशी जिंकली.
Bilateral Hockey Series 2024 : पहिल्याच सामन्यात जर्मनीविरूध्द टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव…
दोन लढतींच्या मालिकेत दोन्ही संघानी 1-1 अशी बरोबरी केली असल्याने मालिका विजय शूटआउटमध्ये ठरविण्यात आला. यामध्ये जर्मनीने 3 गोल केले, मात्र भारताला एकच गोल करता आल्याने भारताने ही मालिका गमावली.





