Paris Olympics 2024 (Men’s Javelin Throw) : नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी ठरला पात्र…

Paris Olympics 2024 (Men’s Javelin Throw) : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्रतेफेरी द्वारे सुवर्णपदकाचा बचाव करण्यासाठी सज्ज झाला आहे. पात्रता स्पर्धेत अव्वल 12 मध्ये स्थान मिळवणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते आणि तो पुन्हा एकदा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा आहे. नीरजचा पात्रता फेरीसाठी ‘ब’ गटात समावेश आहे. त्याचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अर्शद नदीमही याच गटात आहे.
ONE AND DONE!
Men’s Javelin Throw Qualification Update👇🏻
With the quest to defend his crown👑, #TokyoOlympics Gold 🥇 medalist @Neeraj_chopra1 advances to the finals with his first throw of 89.34 metres.
Meanwhile, @Kishore78473748 bows out of the #Paris2024Olympics with… pic.twitter.com/CEgOLvn1ve
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2024
नीरजप्रमाणेच पाकिस्तानचा अर्शद नदीमही पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अर्शदने त्याच्या प्रयत्नात 86.59 मीटर भाला फेकला. अर्शदची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भाला फेकला. पात्रता फेरीत 84 मीटर फेक करणारे खेळाडू थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात, नीरजची या मोसमातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.





