Paris Olympics 2024 (Individual Dressage) : घोडेस्वार अनुष अग्रवाला पदक फेरी गाठण्यात ठरला अपयशी…

Paris Olympics 2024 (Individual Dressage, Anush Agarwalla) : पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा एकमेव भारतीय घोडेस्वार अनुष अग्रवाला बुधवारी अश्वारोहणमध्ये वैयक्तिक ड्रेसेज स्पर्धेत पदक फेरी गाठण्यात अपयशी ठरला.
🇮🇳Result Update: India Men’s Equestrian Dressage event👇@AnushAgarwalla exits from #ParisOlympics2024 after finishing 9th in his group in the #Equestrian Dressage🏇 Group stage event at Château de Versailles. #Paris2024 #ParisOlympics2024 #OlympicGames pic.twitter.com/Xm8NoSrnau
— Team India in Paris Olympics 2024 🏆 (@IndiaInOlympic) July 31, 2024
अनुष त्याचा घोडा ‘सर कार्मेलो’सह एकूण 66.444 गुणांसह त्याच्या गटात नवव्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत एकूण 60 घोडेस्वार सहभागी झाले होते त्यांची प्रत्येकी 10-10 च्या सहा गटात विभागणी करण्यात आली होती. या प्रकारात एकूण 18 रायडर्स अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
डेन्मार्कच्या लॉड्रप-डुफोर कॅथरीन तिच्या ‘फ्रीस्टाइल’ घोड्यासह 80.792 गुणांसह अव्वल स्थानी राहिली. सिसोजेवा सँड्रा ही तिच्या ‘मॅक्सिमा बेला’ घोड्यासह पात्र ठरणारी शेवटची खेळाडू होती. पोलंडच्या या महिला घोडेस्वाराने 73.416 गुण मिळवले. महत्वाचे म्हणजे अश्वारोहण ड्रेसेजमध्ये, पुरुष आणि स्त्रिया एकत्र स्पर्धा करतात.





