Parineeti-Raghav : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्नानंतरचे ‘ते’ फोटो झाले व्हायरल; नेटकरी म्हणाले….

Updated On:
Photo 1

Parineeti-Raghav – अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये लग्नगाठ बांधली.

अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि बॉलीवूड कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती. परिणीती (Parineeti Chopra) आणि राघव (Raghav Chadha) यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे. अद्यापही राघव आणि परिणीतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नुकतंच परिणीतीने तिच्या इंस्टाग्रामवर प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नात विधींसोबतच काही खेळही झाले.

वधू आणि वरांनी नातेवाईकांना एकत्र केले आणि एकत्र संगीत खुर्ची, लिंबू चमचा शर्यत, तीन पायांची शर्यत, क्रिकेट आणि बरेच काही खेळले. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

दरम्यान, हे फोटो शेअर करताना लिहिले की, “आमच्या लग्नाआधीच्या विधी मध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा शर्यत, तीन पायांची शर्यत आणि क्रिकेटचा एक मैत्रीपूर्ण सामना यासारख्या खेळांचा समावेश होता.

खरं तर मजा आली. “जरी चड्ढा या खेळांमध्ये विजेता नसला तरी, आम्ही निश्चितपणे मने जिंकली, विशेषतः परीची… जी आमच्या कुटुंबातील सर्वात आवडती सदस्य बनली आहे.” असं लिहण्यात आलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?