Society election : पारी टॉवर्स निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा विजय
Society election : पुण्यातील नऱ्हे येथील पारी टॉवर्स सोसायटी निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’ परिवर्तन आणि सुशासन पॅनेलचा विजय. सर्व १५ उमेदवार विजयी.

Society election : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’ चिन्हाच्या परिवर्तन आणि सुशासन पॅनेलने विजय मिळवला. पॅनेलचे सर्व १५ उमेदवार विजयी झाले. सर्वसाधारण, महिला राखीव, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती या सर्व प्रवर्गांत पॅनेलने बाजी मारली.
सर्वसाधारण मतदारसंघातून अतुल यादव, अमोल सावंत, गिरीश रंगे, निरंजन माळवदकर, नीरज दोन्हे, प्रवीण कुमकर, शरद शिंदे, श्रीकांत राजोबा, समीर भोकरे आणि सुरेश पिसाळ विजयी झाले. महिला राखीव मतदारसंघातून किरण आगलावे आणि प्राजक्ता तट्टू यांनी विजय मिळवला. ओबीसी प्रवर्गातून रोहन राऊत, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून सुनील सांगळीकर, तर विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून दत्तात्रय पडार विजयी झाले.
विजयानंतर पॅनेलच्या वतीने सभासदांचे आभार मानण्यात आले. सोसायटीचा कारभार पारदर्शक, शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख करण्यासह सभासदांच्या समस्या, देखभाल-दुरुस्तीची कामे आणि आर्थिक पारदर्शकतेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
निवडणूक अधिकारी संतोष तळपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पार पडली. नऱ्हे पोलीस ठाण्याचे अधिकारी शैलेश चव्हाण व पोलीस पथकाच्या सहकार्यामुळे निवडणूक शांततेत पार पडली.
विजयानंतर कोणतीही हुल्लडबाजी न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि ज्येष्ठांच्या हस्ते गणपती आरती करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.





