Nagar | संजीवनीच्या विद्यार्थ्यांचा यशात पालकांचा वाटा

कोपरगाव, (प्रतिनिधी): संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजला मागील चार दशकांपेक्षा मोठी यशस्वी परंपरा आहे. आज संजीवनीच्या माजी विद्यार्थ्यांनी नासापासून ते इस्त्रो आणि महिंद्रापासून ते टेस्ला कंपनीपर्यंत मजल मारली आहे. काही माजी विद्यार्थी देश-परदेशात उच्चपदस्थ अधिकारी आहे.
काहींनी स्वतःचे उद्योग सुरू करून इतरांच्या हातांना काम दिले आहे, हे पालकांच्या सहकार्याने शक्य झाले.
म्हणून पुढील चार वर्षांच्या काळात पालकांनी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजला सहकार्य करावे, आपल्या पाल्यांचे पुढील चाळीस वर्षे आनंदात जातील, असे आवाहन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बी. टेकच्या विविध विद्या शाखांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून कोल्हे बोलत होते.
यावेळी पत्रकार सतीश वैजापुरकर प्रमुख पाहुणे होते. संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, पत्रकार मनोज जोशी, सर्व विभागांचे विभागप्रमुख, डीन्स मंचावर उपस्थित होते. सजग पालकांची संख्या उल्लेखनिय होती.
प्रारंभी डीन अकॅडमिक्स डॉ. ए. बी. पवार यांना स्वागत करून पालक मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. बी. एस. आगरकर यांनी सन १९८३ पासूनचा महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख सादर करून विविध उपलब्धींना स्पर्श केला.
संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजला आॅटोनॉमस दर्जा प्राप्त असल्याने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० चा अंतर्भाव अभ्यासक्रमात केल्याचे सांगितले.
कोल्हे म्हणाले की, आत्तापर्यंत सुमारे ८५ विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठांच्या खर्चाने रिसर्च इंटर्नशिप (संशोधन आंतरवासिता) पूर्ण केली आहे. सात विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या खर्चाने एम.एस.(इंजिनिअरींगमधील पदव्युत्तर पदवी) पूर्ण करीत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे संगीत, गायन, खेळ, असे वेगवेगळे क्लब स्थापन करण्यात आले असून, विद्यार्थी या क्लबच्यामार्फत आपला छंद जोपासू शकतात. यामुळे संजीवनीचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर देखील विविध स्पर्धा जिंकतात.
जापनीज, रशियन, जर्मन, कोरीअन अशा भाषांचेही प्रशिक्षण तज्ञ ट्रेनर्सच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे सांगितले. डीन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग डॉ. विशाल तिडके यांनी सूत्रसंचालन केले. प्रथम वर्षाचे प्रमुख डॉ. बी. आर. शिंदे यांनी आभार मानले.





