Ozar News : विघ्नहर कारखाना वसाहत येथील शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन

ओझर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विघ्नहर कारखाना वसाहत (ता. जुन्नर) येथे २६ जुलै रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शालेय व्यवस्थापन समितीची नव्याने पुनर्रचना करण्यात आली. यावेळी सचिन दादाभाऊ शेलार यांची अध्यक्षपदी, तर दिपाली आशिष शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.मेळाव्यास कारखाना वसाहत व परिसरातील अनेक पालक उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. शासनाच्या निकषांनुसार शालेय व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती आणि विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आल्या. शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी मयूर डोळस, सविता सोमनाथ शिंदे, राहुल शिंदे, राहुल सर्जेराव शिंदे, ज्ञानेश्वर रूपटक्के, सखुबाई कवटे आणि दिलीप भिंगारदिवे यांची निवड झाली.
याप्रसंगी गणेश आवारी, अरुणा आवारी, सोमनाथ शिंदे, आशिष शिंदे, माया संदीप देशमाने, सुधाताई बेनके, राजश्री शेलार, शिक्षणा फाउंडेशन समन्वयक मरभळ सर आणि अंगणवाडी कार्यकर्त्या मोहिनी उनवणे उपस्थित होत्या. शाळेतील उपशिक्षिका विजया रेंगडे यांनी सर्व उपस्थित पालकांचे आभार मानले.





