Maharashtra Politics : राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्याचा शिवसेनेत प्रवेश; धनुष्यबाण हाती घेण्याचं कारण सांगितलं
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर प्रताप देशमुख यांनी ३० ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (धनुष्यबाण) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यां

Parbhani Politics : परभणीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर प्रताप देशमुख हे ३० ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि चार माजी नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra Politics)
अजित पवारांमुळे राजकारणात प्रवेश; आता शिवसेनेत जाण्याचा निर्णय
प्रताप देशमुख यांनी आपल्या पक्षांतरामागचं कारण स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपला राजकीय प्रवास दिवंगत अजित पवार यांच्यामुळे सुरू झाला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर ‘आपले राजकीय पालकच हरवले’ अशी भावना व्यक्त करत देशमुख यांनी राष्ट्रवादीतील राजकीय प्रवासाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पक्षातील कोणत्याही नेत्याविषयी आपली नाराजी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Maharashtra Politics)
‘अजितदादाच आमच्यासाठी पक्ष होते’
देशमुख म्हणाले की, त्यांचं आतापर्यंतचं संपूर्ण राजकीय जीवन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं. पक्षावर कोणतीही नाराजी नाही. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर आपला राजकीय पालकच हरवला असून अजितदादाच आपल्यासाठी पक्ष होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. (Maharashtra Politics)
यानंतर नव्याने राजकीय सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Maharashtra Politics)
३० ऑगस्टला शक्तिप्रदर्शन?
परभणीत ३० ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या वतीने शेतकरी आणि युवकांसाठी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रताप देशमुख यांचा पक्षप्रवेश होणार आहे. (Maharashtra Politics)
देशमुख यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी तसेच चार माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने परभणी शहरातील राष्ट्रवादीच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील इतर पक्षांतील काही मात्तबर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ३० ऑगस्टचा महामेळावा शिवसेनेसाठी शक्तिप्रदर्शन ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Politics)






