Crime News : आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा! रुग्णवाहिकेला उशीर झाल्याने गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; ५ जणांवर गुन्हा दाखल
Crime News : रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचाराअभावी तिची प्रकृती बिघडून गर्भवती महिलेसह तिच्या गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

Crime News : जिंतूर येथे 7 महिन्याच्या गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्यासह गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, या महिलेसाठी 7 वेळा 108 या रुग्णवाहिकेस फोन केला, फोन करुन 2 तास उलटले तरीही रुग्णवाहिका न मिळाल्याने ही घटना घडल्याचा आरोप आहे. (Crime News)
परभणीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या या घटनेनंतर 108 रुग्णवाहिका सेवेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रुग्णवाहिका चालक, संबंधित डॉक्टर तसेच स्त्री रुग्णालयातील डॉक्टर अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)
माहितीनुसार, साठेनगर येथील मरजीनाबी अमीन शेख या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. प्रकृती गंभीर असल्याने तातडीने नांदेडला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी 108 या रुग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क साधला. (Crime News)
रुग्णवाहिकेसाठी तब्बल सात वेळा फोन करण्यात आला. मात्र, दोन तास उलटूनही रुग्णवाहिका आली नाही. अखेर महिलेला परभणीच्या शासकीय स्त्री रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गर्भवती महिलेच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या पतीने कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली. (Crime News)
दरम्यान, आता या प्रकरणात रुग्णवाहिकेसाठी करण्यात आलेले फोन, कॉल रेकॉर्ड, रुग्णवाहिकेचे लोकेशन, चालकाची भूमिका आणि रुग्णालयातील उपचार प्रक्रिया तपासली जाणार आहे. परंतु याबाबत बोलण्यास आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा शासनाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. (Crime News)
रोहित पवारांकडून तीव्र संताप
राष्ट्रवादी काँग्रेस( शप) चे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला. 108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास प्रतीक्षा आणि अखेर 7 महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, हे अत्यंत संतापजनक आहे. (Crime News)
सामान्य माणसाच्या जीवाची शासकीय यंत्रणेला काहीच किंमत नाही का? इन्फ्रामॅन म्हणून मिरवणाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेची ही वेशीवर टांगली गेलेली लक्तरे दिसत नाहीत का? राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना सरकार गाढ झोपेत आहे. अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला. (Crime News)
Crime News : प्रेयसीच्या होकारासाठी तरुण चढला थेट टॉवरवर; तासभर हायव्होल्टेज ड्रामा
Crime News : पुणे शहर पोलिसांची धडक कारवाई; सोनसाखळ्यांची लूट करणारी टोळी 12 तासात जेरबंद






