Ranji Trophy 2025 : पारस डोगराचं रणजीत विक्रमी शतक, वसीम जाफरनंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसराच खेळाडू

Paras Dogra Century record in Ranji Trophy : रणजी ट्रॉफी 2025-26 च्या नव्या हंगामात जम्मू-कश्मीर संघाचा कर्णधार 40 वर्षीय पारस डोगराने मुंबईविरुद्ध श्रीनगरच्या मैदानावर शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू-कश्मीरने पहिल्या डावात 7 बाद 273 धावा केल्या होत्या. यामध्ये पारस डोगरा 112 धावांवर नाबाद आहे.
रणजीत सर्वाधिक शतक झळकावणारा दुसरा खेळाडू –
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीच्या इतिहासात अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. यामध्ये पारस डोगराचे नाव आता विशेष उल्लेखनीय ठरले आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावताना त्याने रणजी ट्रॉफीतील आपले 32 वे शतक नोंदवले. यासह त्याने अजय शर्माला (31 शतके) मागे टाकत सर्वाधिक शतकांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. या यादीत भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर 40 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.
Most Runs In #RanjiTrophy History:
Wasim Jaffer – 12038 #ParasDogra – 9203*
Amol Muzumdar – 9202
Devendrasingh Bundela – 9201
Yashpal Singh – 8700
Mithun Manhas – 8554
Faiz Fazal- 8374
Manoj Tiwary – 8348
Hrishikesh Kanitkar – 8059
📷: PTI#CricketTwitter pic.twitter.com/LAYRb4kldJ
— Niche Sports (@Niche_Sports) October 27, 2024
रणजी ट्रॉफीत सर्वाधिक शतकं झळकावणारे खेळाडू:
- वसीम जाफर: 40 शतके
- पारस डोगरा: 32 शतके
- अजय शर्मा: 31 शतके
- अनमोल मजूमदार: 28 शतके
- ऋषिकेश कानितकर: 28 शतके
हेही वाचा – Abhishek Sharma : आयसीसीने केला अभिषेक शर्माचा गौरव, विस्फोटक कामगिरीसाठी मिळाला खास पुरस्कार
पारस डोगरा रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही वसीम जाफरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जाफरने आपल्या रणजी कारकिर्दीत 12,038 धावा केल्या आहेत, तर पारसने आतापर्यंत 9,500 हून अधिक धावा केल्या आहेत.
जम्मू-कश्मीर आणि मुंबई सामन्याचा आढावा –
जम्मू-कश्मीर आणि मुंबई यांच्यातील सामन्याबाबत बोलायचे झाले तर, मुंबईचा पहिला डाव 386 धावांवर आटोपला. मुंबईकडून सिद्धेश लाडने 116 धावांची, तर शम्स मुलानीने 91 धावांची खेळी केली. दुसरीकडे, जम्मू-कश्मीरचा संघ अजूनही मुंबईच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येपेक्षा 113 धावांनी मागे आहे. पारस डोगराच्या या शानदार कामगिरीमुळे जम्मू-कश्मीरच्या संघाला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली असून, पुढील दिवसांमध्ये त्यांच्याकडून आणखी मजबूत खेळाची अपेक्षा आहे.





