Abhishek Sharma : आयसीसीने केला अभिषेक शर्माचा गौरव, विस्फोटक कामगिरीसाठी मिळाला खास पुरस्कार

अभिषेक शर्माने सप्टेंबर महिन्यातील एकूण सात टी-20 सामन्यांत 314 धावा केल्या, यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. ज्यामध्ये त्याची सरासरी 44.85 इतकी राहिली, जी त्याच्या स्थिर कामगिरीचे द्योतक आहे. या अप्रतिम प्रदर्शनामुळे आयसीसीने त्याचा ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. विशेष म्हणजे महिला गटातही भारताच्या स्मृती मंधानाने हा पुरस्कार पटकावला आहे.
पुरस्कार पटकावल्यानंतर अभिषेक शर्माची प्रतिक्रिया –
Explosive with the bat and in 🔝 form! 💪
Congratulations to #TeamIndia batter Abhishek Sharma on being named the ICC Men’s Player of the Month for September 2025! 👏👏@IamAbhiSharma4 pic.twitter.com/M1Jri2kjZC
— BCCI (@BCCI) October 16, 2025
पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिषेक शर्माने आनंद व्यक्त करताना म्हणाला, “आयसीसीकडून सन्मानित होणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. माझे प्रदर्शन संघाच्या यशात योगदान देऊ शकले, याचा मला आनंद आहे. संघासोबत खेळणे आणि आव्हानांचा सामना करणे नेहमीच प्रेरणादायी आहे.”
दोघांचे योगदान आणि भविष्य –
अभिषेक शर्मा आणि स्मृति मंधाना यांच्या सातत्यपूर्ण आणि शानदार खेळींमुळे केवळ त्यांच्या वैयक्तिक क्षमताच नव्हे, तर भारतीय संघाच्या कामगिरीलाही नवी उंची प्राप्त झाली. आयसीसीचा हा पुरस्कार त्यांच्या मेहनतीचे आणि योगदानाचे फलित आहे. हा सन्मान त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि भविष्यातही त्यांच्याकडून अशीच अपेक्षित कामगिरी पाहायला मिळेल, यात शंका नाही.
आणखी संबंधित बातम्या
Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित

