Imran Khan Health : इम्रान खान यांच्यासाठी क्रिकेट जगतातील दिग्गज एकवटले! कपिल देव यांच्यासह २१ माजी कर्णधारांचे पाक पंतप्रधानांना थेट पत्र
Imran Khan Health : जगातील २१ दिग्गज माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना संयुक्त पत्र लिहून इम्रान खान यांना तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार देण्याची मागणी केली आहे.

21 International Cricket Captains Letter To Shehbaz Sharif Medical Care For Imran Khan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैदानावरचे टोकाचे वैर सर्वश्रुत असले तरी, मैदानाबाहेर खेळाडू एकमेकांशी असलेले मानवी संबंध नेहमीच जपत आले आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि १९९२ चे विश्वविजेते कर्णधार इम्रान खान (Imran Khan) यांच्या आरोग्याबाबत आता जागतिक क्रिकेट वर्तुळातून मोठी चिंता व्यक्त होत आहे. भारताचे महान माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह जगातील २१ दिग्गज माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना संयुक्त पत्र लिहून इम्रान खान यांना तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार आणि मानवी वागणूक देण्याची जोरदार मागणी केली आहे.
२१ माजी कर्णधारांची स्वाक्षरी; भारतासह जगभरातील दिग्गजांचा पाठिंबा –
सहा महिन्यांपूर्वी १४ माजी कर्णधारांनी यासंदर्भात पाकिस्तान सरकारला पत्र पाठवले होते. आता त्यात आणखी ७ कर्णधार सामील झाल्याने स्वाक्षरी करणाऱ्यांची संख्या २१ वर पोहोचली आहे. या पत्रावर भारताकडून सुनील गावस्कर, कपिल देव आणि दिलीप वेंगसरकर यांनी स्वाक्षरी केली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे अॅलन बॉर्डर, ग्रेग चॅपेल, स्टीव्ह वॉ, तर इंग्लंडचे मायकल अॅथर्टन, मायकल ब्रिअर्ली, अॅलिस्टर कूक, डेव्हिड गोव्हर आणि नासेर हुसेन यांसारख्या मातब्बर खेळाडूंचा यात समावेश आहे.
तुरुंगात ढासळते आरोग्य; पाक सरकारसमोर मांडल्या ३ प्रमुख मागण्या;
🚨 BREAKING NEWS 🚨
22 Former international cricket captains have once again written a letter to Pakistan PM over the treatment for Imran Khan. They first wrote a similar letter in February and this one comes after Pak allegedly didn’t completely comply with SC directions.… pic.twitter.com/blq18j1dxe
— Indian Cricket (@IndianCricketHQ) August 23, 2026
- गेल्या तीन वर्षांपासून अदियाला तुरुंगात कैद असलेल्या ७३ वर्षीय इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीय आणि चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माजी कर्णधारांनी पत्रात पाकिस्तान सरकारसमोर तीन स्पष्ट मागण्या ठेवल्या आहेत:
- पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या विशेष वैद्यकीय बोर्डाकडून इम्रान खान यांच्या आरोग्याची निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासणी व्हावी.
- कुटुंबीयांच्या साप्ताहिक भेटींवर कोणताही अडथळा आणू नये.
- वैद्यकीय तपासणीनंतर आवश्यक असलेले सर्व उपचार कोणत्याही विलंबाशिवाय तात्काळ उपलब्ध करून द्यावेत.
घाईघाईत तपासणी करून पुन्हा तुरुंगात पाठवल्याचा आरोप!
कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, न्यायालयाच्या निर्देशानुसार पूर्ण तपासणी होण्यापूर्वीच इम्रान खान यांना काही तासांसाठी रुग्णालयात नेऊन राज्य सरकारच्या वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली आणि घाईघाईत ‘तंदुरुस्त’ घोषित करून पुन्हा अदियाला तुरुंगात डांबण्यात आले. दरम्यान, नेत्ररोगतज्ज्ञ आणि हृदयरोगतज्ज्ञांच्या पथकाने त्यांची तपासणी पूर्ण केल्यानंतर पहाटे पाच वाजता पुन्हा तुरुंगात हलवण्यात आल्याचे सांगत, सरकारकडून इम्रान खान पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.





