Pankaja Munde Vs Bajarang Sonavane : बीडमधून भाजपने विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या भगिणी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बीडमधून बजरंग सोनवणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. आज पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर करत सोनवणे यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे आता पंकजा मुंडे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे आणि अजित पवारांसोबत होते. मात्र काही महिन्यातच त्यांनी घड्याळ सोडून तुतारी हातामध्ये घेतली आणि ते शरद पवारांच्या गटात सामील झाले. | Pankaja Munde Vs Bajarang Sonawane
येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून सोनवणे यांनी साखर कारखान्यावर काम करत आपला दांडगा जनसंपर्क निर्माण केला. यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. तसेच ते बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. | Pankaja Munde Vs Bajarang Sonawane
2019 ला दिली प्रीतम मुंडेंना टफ फाईट
बजरंग सोनवणे यांनी 2019 मध्ये झालेल्या बीड लोकसभेत भाजपच्या प्रीतम मुंडे यांच्याविरोधात दमदार फाईट दिली होती. या लोकसभेत प्रीतम मुंडे यांना 678,175 तर सोनवणे यांना 5,09,807 मते मिळाली होती.यावेळी वंचितच्या उमेदवाराला देखील 92,139 मते मिळाली होती. मात्र यावेळी सोनवणे यांची मोठी ताकद बीडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले होते. | Pankaja Munde Vs Bajarang Sonawane
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केली दुसरी यादी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीत दोन जागांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वाधिक चर्चेत असलेली जागा बीड आणि भिवंडीतून उमेदावर जाहीर करण्यात आले आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे तर भिवंड लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भावना गवळींचे तिकीट कापल्यानंतर एकनाथ शिंदेंची ग्वाही म्हणाले,”राजकारणात काही..”
राज्यात उष्णतेची लाट ! मराठवाडा 40 तर विदर्भ 42 अंशावर.. कस असणार पुढील 8 दिवस तापमान ? वाचा..