46 कोटींची संपत्ती, 32 लाखांचं सोनं…मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट ; बघा पंकजा मुंडेंची दहा वर्षात वाढली ‘एवढी’ संपत्ती?

Pankaja Munde । भाजपकडून बीडमधून पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आलंय. त्यानुसार पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरु केलाय. दरम्यान, कालच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत त्यांनी संपत्ती संबधीचे शपथपत्र सादर केलंय.
शपथपत्रात पंकजा मुंडेंनी यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिलीय. पंकजा मुंडेंकडे एकूण 46 कोटी 11 लाखांची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी दिलीय. पंकजा मुंडे यांच्या संपत्तीमध्ये मागच्या पाच वर्षात दहा कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे यांचे एकत्रित कर्जही 9 कोटी 94 लाखांनी वाढल्याची माहिती त्यांनी या शपथपत्रात दिलीय. तर पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची बाब या शपथपत्रातून समोर आलीय.
46 कोटी 11 लाख 33 हजार 967 रुपयांची संपत्ती Pankaja Munde ।
पंकजा मुंडे यांनी काल भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी सादर केलेले आपल्या संपत्तीच्या विवरणामध्ये पंकजा मुंडे व त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे एकूण 46 कोटी 11 लाख 33 हजार 967 रुपयांची संपत्ती आहे असे जाहीर केले आहे. आपला उमेदवारी अर्ज भरताना पंकजा मुंडे यांनी जोडलेल्या शपथपत्रानुसार पंकजा मुंडे यांच्याकडे सहा कोटी 17 लाख 58 हजार 708 रुपयांची चलसंपत्ती आहे यामध्ये बँकेतील वेगवेगळ्या ठेवी बंद पत्रे विविध कंपन्या व बँकेचे शेअर्स तसेच सोन्याचा यात समावेश आहे.
पंकजा मुंडेंकडे 32 लाख रुपयाचे सोने Pankaja Munde ।
पंकजा मुंडे यांच्याकडे 32 लाख 85 हजाराचे 450 ग्रॅम सोने तर तीन लाख 28 हजार रुपयांची चार किलो चांदी आहे. त्यासोबतच दोन लाख तीस हजारांचे इतर दागिने पण आहेत. पंकजा मुंडे यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे 13 लाखांची 200 ग्रॅम सोने आणि एक लाख 38 हजार रुपयांचे दोन किलोची चांदी आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 | “निवडणूक म्हणजे माझ्यासाठी महायुद्ध..” – पंकजा मुंडे





