पाकिस्तानने खरंच भारताचे पाच विमान पाडले का? व्हिडीओद्वारे पर्दाफाश

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. गावोगावी, शहरांमध्ये मिठाई वाटप आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आनंद साजरा होत आहे. दरम्यान, लज्जास्पद पराभवामुळे पाकिस्तानने सोशल मीडियावर खोटा प्रचार सुरू केला आहे. पाकिस्तानी नेत्यांनी भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला, जो खोटा ठरला आहे. यावर भाजपाने ट्विटरवर व्हिडीओ रिपोस्ट करत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला.
पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल –
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारताचे ब्रिगेड मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा आणि ३ राफेल, १ मिग आणि १ सुखोई अशी ५ विमाने पाडल्याचा दावा केला. यासाठी त्यांनी अनेक वर्षे जुने व्हिडीओ आणि छायाचित्रे शेअर केली. मात्र, भाजपाने जारी केलेल्या व्हिडीओत या सर्व दाव्यांची पोलखोल केली.
भारत के हमले से हैरान-परेशान पाकिस्तान ने खोली झूठ की दुकान!#OperationSindoor को लेकर पाकिस्तान के हर झूठ का पर्दाफाश। pic.twitter.com/TpwtOWKu00
— BJP (@BJP4India) May 8, 2025
हा व्हिडीओ आपल्या X हँडलवर शेअर करत लिहिले, “भारताच्या हल्ल्याने हादरलेल्या पाकिस्तानने खोट्याची दुकान उघडली! ऑपरेशन सिंदूरबाबत प्रत्येक खोट्याचा पर्दाफाश.”
व्हिडीओत काय आहे?
दावा: पाकिस्तानने भारताची ५ लढाऊ विमाने पाडली.
सत्य: पाकिस्तान भारताच्या एकाही विमानाला स्पर्श करू शकला नाही.
दावा: भारताच्या हल्ल्यात सामान्य नागरिक आणि मुलांचा मृत्यू.
सत्य: भारताने केवळ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली.
दावा: श्रीनगर एअरबेससह १५ ठिकाणांवर हल्ले.
सत्य: पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या दिशेने डोळेही उचलू शकला नाही.
जुना व्हिडीओ: पाकिस्तानने ३ राफेल पाडल्याचा दावा करत शेअर केलेला व्हिडीओ ३ डिसेंबर २०२४ चा आहे, जेव्हा राजस्थानात भारतीय हवाई दलाचे मिग-२९ विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते.
सोशल मीडियावर खोटा प्रचार –
पाकिस्तानने जुन्या व्हिडीओ आणि खोट्या माहितीचा आधार घेत भारताविरुद्ध दुष्प्रचार सुरू केला. पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताने आपली सामरिक ताकद पुन्हा सिद्ध केली असून, पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला जनतेनेही ठामपणे नाकारले आहे.





