Ishan Kishan Century : इशानने SMAT फायनलमध्ये झळकावले वादळी शतक! हरियाणाच्या गोलंदाजांची उडाली दाणादाण

Ishan Kishan record breaking century in SMAT 2025 : भारतीय क्रिकेट संघात पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने आपल्या बॅटने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाचे नेतृत्व करणाऱ्या इशान ने ‘सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी २०२५’ च्या अंतिम सामन्यात हरियाणाविरुद्ध धडाकेबाज शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे.
केवळ ४५ चेंडूंमध्ये झळकावले वादळी शतक –
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर गुरुवारी (१८ डिसेंबर) पार पडलेल्या या महामुकाबल्यात इशान किशनचे अत्यंत स्फोटक रूप पाहायला मिळाले. सलामीला येत इशानने हरियाणाच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. त्याने केवळ २४ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याचा वेग कमी झाला नाही आणि अवघ्या ४५ चेंडूंमध्ये त्याने आपले शतक साजरे केले. विशेष म्हणजे, त्याने एका हाताने षटकार खेचत आपली ही संस्मरणीय सेंच्युरी पूर्ण केली.
ईशान किशनने SMAT फायनल मध्ये पुण्यात बॅटिंग मास्टरक्लास दाखवला आहे.
ईशानला मुंबई इंडियन्सने रिटेन न करणे हा थक्क करणारा निर्णय होता.#SMAT2025 #IshanKishanpic.twitter.com/ItSSABlWoZ
— एक क्रिकेटवेडा (@onlyforcricket0) December 18, 2025
इशान किशनने रचले विक्रम –
- पहिला कर्णधार: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासात फायनलमध्ये शतक झळकावणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे.
- अभिषेक शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी: या स्पर्धेत सर्वाधिक ५ शतके झळकावण्याच्या अभिषेक शर्माच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे.
- टी-२० कारकीर्द: इशानच्या टी-२० कारकिर्दीतील हे एकूण ६ वे शतक आहे.
हेही वाचा – KKR ला मोठा झटका! हुकमी एक्का IPL 2026 सोडून मायदेशी परतणार; काय आहे कारण?
विस्फोटक भागीदारी –
इशान किशनने ४९ चेंडूंमध्ये १०१ धावांची खेळी केली, ज्यामध्ये १० षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. त्याने दुसऱ्या विकेटसाठी कुमार कुशाग्रसोबत १७७ धावांची धडाकेबाज भागीदारी केली. कुशाग्रनेही ३८ चेंडूत ८१ धावांचे योगदान दिले, मात्र त्याचे शतक थोडक्यात हुकले.
हेही वाचा – Yashasvi Jaiswal : जैस्वालची तब्येत अचानक बिघडली; दोन दिवसांत २ किलो वजन घटलं, नेमकं काय झालं? जाणून घ्या
या धडाकेबाज कामगिरीमुळे इशान किशनने आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी भारतीय संघातील आपला दावा अधिक भक्कम केला आहे. त्याच्या या खेळीमुळे झारखंडने फायनलमध्ये हरियाणासमोर २६३ धावांचे डोंगराएवढे आव्हान उभे केले.





